Nagpur Rain Update : उपराजधानीत पुन्हा अवकाळी पाऊस; अनेक तालुक्यांमध्ये पिकांचे नुकसान, शेतकरी चिंतेत

शहरात मंगळवारी पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावली. शनिवार आणि रविवारीही अवकाळी पावसाने शहराला तडाखा दिला होता. सततच्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
Nagpur Rain Update
Nagpur Rain UpdateSakal

Nagpur News : शहरात मंगळवारी पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावली. शनिवार आणि रविवारीही अवकाळी पावसाने शहराला तडाखा दिला होता. सततच्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. जिल्ह्यात अनेक तालुक्यांमध्ये पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत. शहरात सायंकाळी सात मिमि पावसाची नोंद झाली. सांयकाळी पावसामुळे घरी परतणाऱ्या चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली.

सकाळपासून आभाळी वातावरण होते, त्यानंतर दुपारी ऊन सावलीचा खेळ सुरू होता. दुपारनंतर सूर्य ढगांच्या आड गेला अन् पुन्हा गारवा जाणवू लागला. दरम्यान पावसाच्या सरी कोसळल्या. नेमके कार्यालयातून घरी निघण्याच्या वेळीच पाऊस सुरू झाल्याने चाकरमान्यांना गैरसोयींचा सामना करावा लागला. थांबून थांबून सरी कोसळत असल्याने वाहनचालकांना वाटेत पावसापासून बचावासाठी आडोसा शोधावा लागला.

७ मिमी पावसाची नोंद

मंगळवारी सायंकाळी शहराच्या बहुतेक भागांत पावसाने दमदार हजेरी लावली. सायंकाळी ५.३० ते ७ दरम्यान शहरात ७ मिमी पाऊस झाल्याची नोंद हवामान विभागाकडे झाली. सततच्या पावसामुळे तापमानात लक्षणीय घट झाली आहे. मंगळवारी शहराचे कमाल तापमान ३२.६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. ते सोमवारच्या तुलनेत जवळपास २ अंशांनी तर सरासरीपेक्षा ४.३ अंशांनी कमी आहे. किमान तापमानही २२.१ अंशांवर आले असून ते सरासरीपेक्षा २.१ अंशाने कमी आहे.

आजही पावसाची शक्यता

बुधवारीसुद्धा शहरासह लगतच्या काही भागात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. २१ ते २५ मार्चदरम्यान काहीसे ढगाळ वातावरण राहील. त्यामुळे उन्ह सावलीचा खेळ सुरू राहिली. या काळात शहराचे कमाल तापमान ३५ ते ३७ अंश तर किमान तापमान २१ ते २२ अंशादरम्यान राहण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com