नागपुरात आज ज्येष्ठांना मिळणार नाही लस, फक्त १८ ते ४५ वयोगटातील तरुणांचेच होणार लसीकरण

Vaccination
VaccinationSakal
Updated on

नागपूर : शहरात लसींचा (corona vaccination) तुटवडा निर्माण झाल्याने ६० आणि ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण (vaccination) तात्पुरते बंद करण्यात आले आहे. त्यामुळे मंगळवारी (ता.४) फक्त १८ ते ४५ वयोगाटातील युवकांचे लसीकरण होणार असल्याचे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी कळविले आहे. (vaccination available for only 18 to 45 age group people on tuesday in nagpur)

Vaccination
वादळानं पाळण्यातील बाळ १०० फूट उंच उडालं, आईनं फोडला एकच हंबरडा

शहरातील ४५ वर्षावरील वयोगटातील नागरिकांचे मंगळवारी (ता. ४) रोजी मनपाच्या स्व.प्रभाकरराव दटके, महाल रोग निदान केंद्र येथेच होणार आहे. इतर केंद्रांवर लसीकरण होणार नाही. पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध न झाल्यामुळे लसीकरण होणार नाही. लसींचा साठा आल्यानंतरच लसीकरण पुन्हा सुरू करण्यात येईल, असे ही त्यांनी सांगितले. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये कोव्हॅक्सिनचा दुसरा डोज दिल्या जाईल. स्व.प्रभाकरराव दटके, महाल रोग निदान केंद्र येथेही कोव्हॅक्सिन दिल्या जाईल.

नागपूर अन् विदर्भातील बातम्या वाचण्यासाठी इथं क्लिक करा -

मागील आठ दिवसांपासून लसींचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे ज्येष्ठांना दुसरी लस घेण्यासाठी चांगलीच अडचण येत आहे. अनेकांना चकरा माराव्या लागत आहे. लसी उपलब्ध नसल्याने त्यांना केंद्रावरून परत पाठविले जात आहे. त्यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिक चिंतेत पडले आहे. ४५ वर्षांवरील बहुतांश नागरिकांचा लसीचा डोस पूर्ण झालेला आहे. त्यांना दुसरा डोस मे महिन्यात घ्यायचा आहे.

Vaccination
१५ टक्के कर्मचाऱ्यांमुळे विद्यापीठावर वाढला कामाचा बोजा; परीक्षेसह इतर कामे खोळंबली

१८ वर्षांवरील व्यक्तींचे लसीकरण मनपाद्वारे निर्धारित इंदिरा गांधी रुग्णालय गांधीनगर, पाचपावली सूतिकागृह व आयसोलेशन हॉस्पिटल इमामवाडा या तीन केंद्रांवर सुरू राहील. विशेष म्हणजे १८ ते ४४ वर्ष वयोगटातील व्यक्तींना लसीकरणासाठी ऑनलाइन नोंदणी अनिवार्य आहे. ऑनलाइन नोंदणी झालेल्या व्यक्तींना लसीकरण केंद्रावरून जी वेळ देण्यात आली आहे त्याच वेळेत त्यांनी उपस्थित राहावे. केंद्रावर गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहनही राम जोशी यांनी केले आहे.

(vaccination available for only 18 to 45 age group people on tuesday in nagpur)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com