esakal | कर्मचाऱ्यांना कोंडले : लसीकरण केंद्रावर ‘ठाकूरकी’; पोलिस ठाण्यात तक्रार
sakal

बोलून बातमी शोधा

कर्मचाऱ्यांना कोंडले : लसीकरण केंद्रावर ‘ठाकूरकी’; ठाण्यात तक्रार

कर्मचाऱ्यांना कोंडले : लसीकरण केंद्रावर ‘ठाकूरकी’; ठाण्यात तक्रार

sakal_logo
By
राजेश चरपे

नागपूर : अयोध्यानगर परिसरातील महापालिकेच्या दुर्गानगर शाळेतील लसीकरण केंद्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांना मारहाण करून कोंडून ठेवल्याने भाजपच्या नगरसेविकेच्या पतीविरुद्ध हुडकेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आला आहे. दिवसभरासाठी निश्चित केलेले लसीकरण पूर्ण करावे यासाठी कर्मचाऱ्यांना कोंडून ठेवल्याची घटना रविवारी घडली. याची कर्मचाऱ्यांनी तक्रार दाखल केल्याने हा प्रकार उघडकीस आला. (Vaccination-Center-Beating-health-workers-BJP-corporator-Report-to-police-station)

हुडकेश्वर पोलिस ठाण्यात तसेच महापालिका आयुक्तांकडेही तक्रार करण्यात आली आहे. मात्र, याची दखल घेतली जात नसल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. दुर्गानगर शाळेतील लसीकरण केंद्रावर भाजपच्या नगरसेविका रूपाली ठाकूर व त्यांचे पती परशू ठाकूर नियमितपणे लक्ष ठेवून असतात. ११ जुलैला दिवसभरात २८० नागरिकांचे लसीकरण करण्यात यावे, असे निश्चित करण्यात आले होते. यासाठी २८ व्हायल्स या केंद्रावर देण्यात आल्या होत्या. मात्र, केंद्रावरील कर्मचाऱ्यांकडे यासंबंधी असलेल्या सॉफ्टवेअरमध्ये काही तांत्रिक बिघाड असल्याने अडचणी येत होत्या.

हेही वाचा: भाजपशी जवळीक असलेला ओबीसी चेहरा राष्ट्रवादीच्या गळाला

या कारणाने लसीकरणाची गती संथ होती. त्यामुळे दुपारपर्यंत १३० ते १४० नागरिकांचे लसीकरण झाले. सायंकाळपर्यंत २३० नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले. त्यानंतर लसीकरण थांबवण्यात आले. मात्र, नगरसेविका रूपाली ठाकूर व त्यांचे पती परशू ठाकूर यांनी उर्वरित ५० नागरिकांचे लसीकरण करावे, असा आग्रह धरला. यास कर्मचाऱ्यांनी नकार दिला. त्यातच अचानक बाहेर उभे असलेले नागरिक आत आले व त्यांनी कर्मचाऱ्यांना केंद्रावर डांबून ठेवले असा दावा लसीकरण कर्मचाऱ्यांनी केला आहे.

याची लेखी तक्रार महापालिका आयुक्त, आरोग्य अधिकारी आणि हनुमाननगर झोनच्या साहाय्यक आयुक्तांना दिली आहे. तसेच डांबून ठेवल्याची तक्रार हुडकेश्वर पोलिस ठाण्यात करण्यात आली. दरम्यान, यावेळी परशू ठाकूर त्याठिकाणी नव्हते. नागरिक व केंद्रावरील कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाल्याने नागरिक अचानक आत शिरले व आतून दार लावून घेण्यात आले, असे हनुमाननगर झोनच्या सूत्रांनी सांगितले.

(Vaccination-Center-Beating-health-workers-BJP-corporator-Report-to-police-station)

loading image