esakal | लसीकरण ; गर्भातील बाळाची कवचकुंडले!
sakal

बोलून बातमी शोधा

vaccine

लसीकरण ; गर्भातील बाळाची कवचकुंडले!

sakal_logo
By
केवल जीवनतारे

नागपूर : गर्भवती मातेने कोविड लस घेतल्यास त्याचा फायदा शिशुलाही होतो. स्तनपानातून बाळाच्या शरीरात प्रतिपिंडे(अ‍ॅन्टिबॉडीज) तयार होत असल्याचे एका अभ्यासातून पुढे आले आहे. त्यामुळे गर्भवती आणि स्तनदा मातांनी कोविड लस घेणे आवश्यक झाले आहे. गर्भातील बाळासाठी लस कवचकुंडलेच आहेत.

भारतात टीटीची (धनुर्वाताच्या) लस मातेने घेतल्यानतंर आईच्या दुधातून बाळाला याचा लाभ होत असल्याने याला नागपुरातील तज्ज्ञांनी दुजोरा दिला आहे. तिसऱ्या लाटेचा धोका लहान मुलांना आहे, असे वर्तविण्यात येत असले तरी सर्वच वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणावर प्रशासनाकडून भर देण्यात येत आहे. लसीकरणाबाबत संभ्रम असल्याने गर्भवतींमध्ये लस घेण्याचे प्रमाण अल्प आहे. हीच बाब लक्षात घेत गर्भवतींच्या लसीकरणानंतर बाळामध्ये होणाऱ्या परिमाणाचा अभ्यास विदेशात झाल्यानंतर नागपुरातील तज्ज्ञांची मते जाणून घेतली. गर्भवती मातेचे लसीकरण झाल्यास मातेची रोगप्रतिकाशक्ती वाढते. त्याचा गर्भातील बाळाला फायदा होतो आणि जन्मानंतर बाळ या विषाणूपासुन सुरक्षित राहते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. इजराईलमधील जामा नेटवर्कद्वारे हा संशोधन प्रबंध प्रकाशित केला आहे. बाळाला दूध पाजणाऱ्या ८४ महिलांना कोरोना फायझर लसीचे २१ दिवसाच्या अंतराने दोन डोस दिले. यानंतर लसवंत माता ३४ वयोगटातील होत्या. बाळ ७ दिवसांपासून तर साडेसात महिन्यांचे होते. यात मातांचे लसीकरणापूर्वीचे व लसीकरणानंतरचे रक्ताचे नमुने घेण्यात आले.

हेही वाचा: नागपूर : कॅन्सर इन्स्टिट्यूटसाठी ‘टाटा’ची मदत

पहिला डोस घेतल्यानंतर दुसऱ्या आठवड्यापासून पुढील ६ आठवड्यापर्यंत ६ दिवसातून एकदा रक्ताचा नमुना घेण्यात आला. यात ५०४ ब्रेस्ट मिल्कचे नमुने गोळा केले. लसीकरणाच्या दोन आठवड्यानंतर ६१.८ टक्के नमुने सकारात्मक आले असून रोगप्रतिकारशक्ती वाढली असल्याचे पुढे आले. चौथ्या आठवड्यात ८६.१ टक्के नमुने सकारात्मक आले, सहाव्या आठवड्यात ६५.७ टक्के नमुने सकारात्मक आलेत. याप्रकारचा अभ्यास फ्लोरिडाच्या एका विद्यापीठासह इतरही देशात झाला आहे. सर्वांचे निष्कर्ष सकारात्मक असल्याचे नागपुरातील वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात.

शिशू गर्भात आकार घेत असताना बाळ सुदृढ व्हावे यासाठी गर्भवती मातांना प्रसूत होईपर्यंत अनेक लस देण्यात येतात. टिटॅनस (टिटी) चे इंजेक्शन गर्भवती मातेला टोचण्यात येते. तसेच इतरही लस बाळाच्या सुरक्षेसाठी दिल्या जातात. गर्भवती मातेला कोरोना नियंत्रणासाठीचे लसीकरण झाल्यानंतर तिच्या शरिरात रोगप्रतिकार शक्ती (अ‍ॅन्टिबॉडी) तयार होतात.

- डॉ. सीमा पारवेकर, वैद्यकीय अधीक्षक, डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालय, नागपूर.

loading image
go to top