१४ केंद्र, ३३ शाळा, महाविद्यालयातून लसीकरण; ऑनलाइन, ऑफलाईन नोंदणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

१४ केंद्र, ३३ शाळा, महाविद्यालयातून लसीकरण; ऑनलाइन, ऑफलाईन नोंदणी
१४ केंद्र, ३३ शाळा, महाविद्यालयातून लसीकरण; ऑनलाइन, ऑफलाईन नोंदणी

१४ केंद्र, ३३ शाळा, महाविद्यालयातून लसीकरण; ऑनलाइन, ऑफलाईन नोंदणी

नागपूर : शहरातील १५ ते १८ वयोगटासाठी उद्यापासून लसीकरणाला (Vaccination) सुरवात होणार आहे. महापालिकेने (Nagpur Municipal Corporation)काल जाहीर केलेल्या सात केंद्रांमध्ये आज आणखी सात केंद्रांची भर घातली. त्यामुळे आता १४ स्थायी केंद्रांसह ३३ शाळा, महाविद्यालयातून लसीकरण करण्यात येणार आहे. लसीकरणासाठी आधार कार्ड, मोबाईल आवश्यक असून शाळा, महाविद्यालयातील केंद्रांवर ऑनलाइन नोंदणीची गरज नसल्याचे महापालिकेने स्पष्ट केले.

हेही वाचा: चैतन्य टेस्ट ट्युब बेबी सेंटरचे कार्य कौतुकास्पद; अजित पवार

दहावी ते बारावीतील विद्यार्थ्यांचे वय १५ ते १८ आहे. त्यामुळे महापालिकेने शैक्षणिक संस्थांनाही लसीकरण शिबिरासाठी विनंती केली. महापालिकेच्या विनंतीला शाळा, महाविद्यालय संचालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ३३ शाळा, महाविद्यालयांनी लसीकरणासाठी पुढाकार घेतला. या ३३ शाळांमधील १६ हजार ३२ विद्यार्थ्यांचे लसीकरण शाळेतच करण्यात येणार आहे. १४ केंद्रांवर उद्यापासून सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोवॅक्सिन लस दिली जाणार आहे.

लसीकरणासाठी ऑनलाइन किंवा ऑफलाईन नोंदणी अनिवार्य असून शैक्षणिक संस्थांमधील केंद्रांवर ऑनलाइन नोंदणीची गरज नाही. लसीकरणास पात्र लाभार्थ्यांनी लसीकरण केंद्रावर जाताना स्वत:चे आधार कार्ड आणि मोबाईल आवश्यक आहे. १५ ते १८ वर्ष वयोगटातील मुले आणि मुलींचे लसीकरण मोहिमेला महापौर दयाशंकर तिवारी यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या, सोमवारी सकाळी १०.३० वाजता राजकुमार गुप्ता समाजभवन, बजेरिया येथे प्रारंभ होईल. शैक्षणिक संस्थांमधील केंद्रावर विद्यार्थ्यांची नोंदणी करून त्यांना लस देण्यात येईल. केंद्रावर विद्यार्थ्यांना अर्धा तास डॉक्टरांच्या देखरेखीत ठेवले जाईल.

हेही वाचा: राज्यातील शाळांमध्ये ‘१०० दिवस वाचन अभियान’

या चौदा केंद्रावर लसीकरण

मेडिकल, एम्स, गांधीनगरातील मनपाचे इंदिरा गांधी रुग्णालय, एम्समधील आयुष इमारत, दिघोरीतील प्रगती सभागृह, आयसोलेशन हॉस्पिटल, कामठी रोडवरील डॉ. आंबेडकर रुग्णालय, सच्चिदानंदनगर उद्यान, स्व. प्रकारराव दटके महाल रोगनिदान केंद्र, दीक्षाभूमी, हंसापुरी आयुर्वेदिक दवाखाना, केटीनगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, पाचपावली सूतिकागृह आणि मध्य रेल्वे रुग्णालय.

झोननिहाय या शाळांमध्ये लसीकरण

  • लक्ष्मीनगर : आंबेडकर कॉलेज, यशोदा स्कूल, विद्या साधना स्कूल, एनएमसी स्कूल जयताळा, सरस्वती स्कूल, राय स्कूल, शिवाजी सायन्स कॉलेज, सोमलवार स्कूल, धनवटे नॅशनल स्कूल, टिपटॉप स्कूल.

  • धरमपेठ : सांदीपनी स्कूल, सेंट उर्सुला स्कूल.

  • हनुमाननगर : गजानन विद्यालय, प्रेरणा कॉन्व्हेंट शाळा, एबीसी कॉन्व्हेंट, बिंझाणी कॉलेज.

  • धंतोली : पंडीत देसराज स्कूल.

  • नेहरूनगर : विदर्भ बुनियादी, स्टार पॉइंट स्कूल.

  • गांधीबाग, महाल : गोवर्धनदास रावल हायस्कूल, सरस्वती स्कूल.

  • सतरंजीपुरा : ओम हायस्कूल, महात्मा फुले हायस्कूल, संत कबीर हायस्कूल, नवशक्ती विद्यालय.

  • लकडगंज : केडीएन कॉलेज.

  • आशीनगर : पीडब्लूएस कॉलेज, डीआरबी सिंधू महाविद्यालय, सिंदी हिंदी स्कूल.

  • मंगळवारी : दयानंद कन्या शाळा, एसएफएस कॉलेज सेमीनरी हिल्स, आशीर्वाद हायस्कूल गोधनी रोड, बहुजन हिताय सिद्धार्थ होस्टेल.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top