esakal | ‘फूल तुम्हे भेजा है...’; व्हॅलेंटाईनमुळे निर्यातदारांना ‘अर्थ’वेध
sakal

बोलून बातमी शोधा

 valentine day flower story

एवढे असूनही ‘व्हॅलेंटाईन डे‘ निमित्त जगभरात तरुणाईचा उत्साह लक्षात घेत फुलांची निर्यात केली जात आहे. यातून फुलशेतीच्या उत्पादकांसह व्यापारी व निर्यातदारांनाही चांगला परतावा मिळण्याची आशा आहे. 

‘फूल तुम्हे भेजा है...’; व्हॅलेंटाईनमुळे निर्यातदारांना ‘अर्थ’वेध

sakal_logo
By
प्रशांत रॉय

नागपूर : मनातील हळुवार भावना निःसंकोचपणे दुसऱ्या व्यक्तींपर्यंत पोहोचवण्याचे साधन म्हणजे सुंदर, टवटवीत फुलं. प्रेमीजणांनी या भावनेला आणखी उदात्त केले ते प्रेम दिवस म्हणजेच ‘व्हॅलेंटाइन डे’च्या स्वरूपात. याचा लाभ व्यापारी, उद्योजक यांनी उचलला नाही तर नवलच. फुलनिर्यातीतून कोट्यवधींची उलाढाल होत आहे. यंदाच्या व्हॅलेंटाईनला मात्र कोविडचा डंख बसला आहे. परिणामी मागील काही वर्षांच्या तुलनेत यंदाचा प्रेमदिन बिझनेसच्या दृष्टीने काहीसा थंडच राहणार असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

डच गुलाबासह विविध रंगाचे गुलाब, ॲस्टर, जरबेरा, ग्लॅडिओलस, कार्नेशन, ऑर्किड, ऍन्थुरिअम, लिली, कुंदा, मोगरा, झेंडू, गुलछडी आदी फुलांची परदेशात दरवर्षी निर्यात केली जाते. यंदा कोविड आणि हवामान बदलाचा फटका फुलनिर्यातीला बसण्याची शक्यता आहे. एवढे असूनही ‘व्हॅलेंटाईन डे‘ निमित्त जगभरात तरुणाईचा उत्साह लक्षात घेत फुलांची निर्यात केली जात आहे. यातून फुलशेतीच्या उत्पादकांसह व्यापारी व निर्यातदारांनाही चांगला परतावा मिळण्याची आशा आहे.

जाणून घ्या - जेवणासाठी बाहेर गेलेल्या मुलाची २८ दिवासांनी फक्त मिळाली कवटी; टी-शर्ट बघताच आईने फोडला हंबरडा

ब्रिटनच्या फ्लाइट बंदीने घोर

ब्रिटनवासींना भारतीय फुलांचे मोठे आकर्षण आहे. विविध रंगाच्या गुलाबासह इतर फुलांनाही चांगली मागणी येथून असते. परंतु कोविडमुळे ब्रिटनसह युरोप आणि अमेरिकेतून यंदा मागणी कमीच आहे. विशेष म्हणजे ब्रिटनला येणाऱ्या जाणाऱ्या फ्लाइटवर भारताने तात्पुरती बंदी घातलेली आहे. त्यामुळे त्याचा फटका भारतीय फूल निर्यातदारांना बसणार आहे, असे मत इंडियाज ग्रोअर फ्लॉवर काउन्सिलचे अध्यक्ष श्रीकांत बोलापल्ली यांनी व्यक्त केले आहे. 

देश निर्यात उत्पन्न
अमेरिका ३२७६.०८ १३,९०२.७०
नेदरलॅन्ड १३७७.०८ ७८५२.२६ 
जर्मनी १११२.५२ ४०९३.४७ 
इंग्लंड १२३६.७४ ४.०९१.६७ 
युएई १४९९.०७ ३३११.२४

(निर्यात-दशलक्ष टन, उत्पन्न-लाख रुपयांत) 

निर्यातयोग्य गुलाबाचे दर

 • ४० सेंटीमीटर---७ ते १० 
 • ५० सेंटीमीटर---१० ते १६ 
 • ६० सेंटिमीटर---१५ ते २५ 

जाणून घ्या - सतत थकवा जाणवतो, काम करण्याची इच्छा होत नाही; आयुर्वेदात आहे तुमच्या प्रश्नांची उत्तरे

२०१९-२० मधील भारताची फुलनिर्यात

 • निर्यात---१६,९४९.३७ दशलक्ष टन 
 • परकीय चलन---७५.८९दशलक्ष डॉलर (५४१.६१ कोटी) 
 • २०१५-१६ मध्ये भारतात फुलांखालील लागवड क्षेत्र---२४८ हजार हेक्टर 

प्रमुख फूल उत्पादक राज्य

 • महाराष्ट्र
 • कर्नाटक
 • आंध्र प्रदेश
 • हरियाना
 • तमिळनाडू
 • राजस्थान
 • पश्चिम बंगाल
loading image