esakal | कोरोनाचा फटका! भाजीचे भाव वाढलेल्या स्थितीत स्थिरावले
sakal

बोलून बातमी शोधा

Vegetable prices stabilized corona virus effect

स्थानिक शेतकऱ्यांकडून भाजींची आवक कमी झालेली असताना छत्तीसगड, अमरावती, नाशिक येथून थोड्याफार प्रमाणात भाजीची आवक सुरू झाली आहे. ती अल्प असल्याने भाव वाढ झाली आहे.

कोरोनाचा फटका! भाजीचे भाव वाढलेल्या स्थितीत स्थिरावले

sakal_logo
By
राजेश रामपूरकर

नागपूर : जिल्हा प्रशासनाने दोन दिवस जीवनावश्यक वस्तू वगळता सर्वच व्यापार बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे कळमना आणि महात्मा फुले मार्केटमध्ये भाजीची आवक कमी झाली आहे. त्याबरोबरच ग्राहकांची वर्दळही कमी असल्याने भाजीचे भाव वाढलेल्या स्थितीत स्थिरावले आहेत.

दोन ते तीन महिन्यांपासून स्थानिक शेतकऱ्यांकडून भाजीची आवक वाढलेली होती. त्यामुळे भाजीचे भाव कमी झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला होता. आता उन्ह वाढू लागली आहे. स्थानिक शेतकऱ्यांच्या शेतातील भाजीचे उत्पादन कमी झाल्याने आवक कमी झाली आहे. आठवड्यापूर्वी १५० गाड्या भाजीची आवक होत होती. ती आता ८० वर आली आहे. त्यामुळेच भावात वाढ झालेली आहे असे राम महाजन म्हणाले.

अधिक वाचा - संजय राठोड उद्या देणार मंत्रिपदाचा राजीनामा?, तर विदर्भातील आमदाराला मिळणार वनखाते?

स्थानिक शेतकऱ्यांकडून भाजींची आवक कमी झालेली असताना छत्तीसगड, अमरावती, नाशिक येथून थोड्याफार प्रमाणात भाजीची आवक सुरू झाली आहे. ती अल्प असल्याने भाव वाढ झाली आहे. आता आवक कमी होऊ लागली असून, काही दिवसांत भाववाढ अटळ आहे. महाशिवरात्रीनंतर भाजीचे भाव अजून वाढण्याचे संकेतही व्यापाऱ्यांनी दिले.

भाजीपाला दर (रुपये प्रतिकिलो)
हिरवी मिरची २५
गाजर २० 
मुळा २० 
काकडी २० 
दुधी भोपळा १५ 
भेंडी ३० 
कोथिंबीर २० 
शिमला मिरची ४० 
कोहळा १५ 
मेथीची भाजी २० 
पालक १० 
गवार शेंगा ६० 
कारले ५० 
चवळीच्या शेंगा ४० 
पानकोबी ०८ 
फुलकोबी १५ 
टोमॅटो २० 
वांगे १५