Number Plate : नादच खुळा! आवडत्या नंबरसाठी मोजले कोट्यवधी

नवीन गाडी घेतल्यानंतर पसंतीचा क्रमांक, पूर्ण क्रमांकांची बेरीज आपल्या पसंतीची यावी यासाठी वाट्टेल ती किंमत मोजली जाते.
Vehicle Number Plate
Vehicle Number PlateSakal

नागपूर - हौसेला काही मोल नसते. त्यामुळे वाहनाला आपल्या पसंतीचा क्रमांक मिळावा म्हणून नागपूरकर वाहनचालकांनी चक्क दहा महिन्यात एकूण ४ कोटी २३ लाख रुपये मोजल्याची माहिती पुढे आली आहे.

नवीन गाडी घेतल्यानंतर पसंतीचा क्रमांक, पूर्ण क्रमांकांची बेरीज आपल्या पसंतीची यावी यासाठी वाट्टेल ती किंमत मोजली जाते. आपले वाहन इतरांपेक्षा वेगळे दिसावे, वाहन क्रमांकही लक्षवेधी असावा, अशी हौस अनेकांना असते. अशा लोकांनी पसंतीच्या क्रमांकासाठी वाट्टेल ती किंमत मोजली आहे.

यातूनच जानेवारी ते ऑक्टोबर २०२३ या दहा महिन्यात नागपूर प्रादेशिक परिवहन कार्यालयाला (आरटीओ) चक्क ४ कोटी २३ लाख रुपये मिळाले. ग्रामीण आरटीओला ३ हजार २०३ लोकांनी २ कोटी १२ लाख रुपये वाहनचालकांनी दिले तर शहर आरटीओला २ कोटी ११ लाख रुपये महसूल मिळालेत.

Vehicle Number Plate
Nagpur News : अंबाळा तलावाजवळील वास्तूंचा जीर्णोद्धार; ७३ तीर्थस्थळांचा करणार कायापालट

एखाद्या वाहनाच्या सिरीजमध्ये पसंतीचा क्रमांक नसल्यास तिप्पट पैसे मोजावे लागतात. ‘०००७’ हा ५० हजार रुपयांना जाणारा क्रमांक कारमध्ये उपलब्ध नसल्याने ट्रकच्या सिरीजचा क्रमांक ग्रामीणमध्ये एका हौशी वाहनमालकाला दीड लाखात देण्यात आला. पसंतीचा नंबर क्रमांकासाठी ३ हजार रुपयांपासून तर मेट्रो शहरात ४ लाख रुपयांपर्यंत आरटीओकडून आकारले जातात. एकच नंबर अनेकांना हवा असल्यास त्याची बोलीसुद्धा लावण्यात येते.

लकी नंबरचे फॅड

मोठ्या शहरी भागात ‘०००१’ हा चार लाखांचा क्रमांक आहे. शहर ओरटीओकडे यंदा याची नोंद झाली आहे. मात्र, ग्रामीणमध्ये एकाही व्यक्तीने हा क्रमांक खरेदी केला नाही. नागपूरकरांमध्ये लकी नंबरचे फॅड असून सिरीजमध्ये ‘७’ आणि ‘९’ क्रमांकाला जास्त मागणी असल्याचे पुढे आले आहे.

मागील वर्षीच्या तुलनेत यंदा व्हीआयपी नंबरमध्ये वाढ झाली आहे. ज्यांना पसंतीचा नंबर हवा असतो त्यांना शासनाने विहित केलेले शुल्क भरून नंबर आरक्षित करता येतो.

- हर्षल डाके, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, शहर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com