

Farmers' organisations stage a protest outside the Nagpur Collector's Office, demanding loan waivers and ₹50,000 per acre in assistance.
esakal
नागपूर: दुष्काळासाठी जाहीर केलेली पाच हजार रुपयांची मदत म्हणजे शेतकऱ्यांची क्रूर थट्टा असल्याचा आरोप करीत विदर्भ राज्य आंदोलन समिती (विराआंस) आणि शेतकरी संघटनांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘भीक मांगो’ आंदोलन केले.
आंदोलनातून जमा झालेली रक्कम निवासी जिल्हाधिकारी इंदिरा चौधरी यांच्याकडे सुपूर्द करून ती मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्याची विनंती आंदोलकांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे निवेदनही सादर करण्यात आले. यंदा अल्प पावसामुळे खरीप पिकांचे नुकसान झाले असून, चारा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.