नागपूर : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मध्य भारतात जोरदार पावसाची परिस्थिती तयार झालीये. काल (मंगळवार) विदर्भात पावसाने (Vidarbha Rain Alert) जोरदार हजेरी लावली. नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांसाठी हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जाहीर केला होता, त्यानुसार सोमवारी मध्यरात्रीनंतरच पावसाला सुरुवात झाली.