esakal | विदर्भ : सर्वात महाग सिलिंडर गडचिरोलीत
sakal

बोलून बातमी शोधा

LPG gas delivery

विदर्भ : सर्वात महाग सिलिंडर गडचिरोलीत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : पेट्रोलियम कंपन्यांनी सलग तिसऱ्या महिन्यात घरगुती वापराच्या सिलिंडरच्या दरात वाढ करून सर्वसामान्यांना झटका दिला आहे. सिलिंडरच्या दरात २५ रुपये वाढ झाली. एक जानेवारीपासून घरगुती वापराचा अनुदानित सिलिंडर १९० रुपयांनी महागला आहे.

आजच्या दरवाढीनंतर १४.२ किलोचा अनुदानित घरगुती सिलिंडरचा भाव ९११.५० रुपये झाला आहे. शहरात सबसिडीवाल्या घरगुती सिलिंडरच्या किमतीत २५ रुपयांची वाढ झाली असून त्याचा भाव ९११ रुपये झाला आहे. देशभरातील हा सर्वाधिक दर आहे. विशेष म्हणजे गेल्या सात वर्षात घरगुती गॅसची किंमत दुपटीने वाढली आहे. मार्च २०१४ मध्ये घरगुती गॅस सिलिंडरची किंमत ४१०.५० रुपये होती

हेही वाचा: लसीकरण ; गर्भातील बाळाची कवचकुंडले!

गेल्या महिन्यात कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या दरात तब्बल ८३.५० रुपयांची वाढ केली होती. वाणिज्य वापराच्या सिलिंडरमध्ये देखील आजपासून ७५ रुपयांनी महागला आहे. एक सप्टेंबरपासून देशभरात वाणिज्य वापराचा १९ किलोचा गॅस सिलिंडर ७५ रुपयांनी महागला आहे. शहरात १९ किलोचा गॅस सिलिंडर १८१४.०३ रुपये झाला होता. या याआधी १७ ऑगस्ट २०२१ रोजी कंपन्यांनी वाणिज्य वापराच्या सिलिंडरच्या किमतीत ६८ रुपयांची वाढ केली होती.

जिल्हा - सिलिंडरचे दर

 • नागपूर - ९११.५० रुपये

 • गडचिरोली- २२९. ५० रुपये

 • भंडारा - ९२० रुपये

 • गोंदिया - ९२८ रुपये

 • वर्धा - ९२० रुपये

 • यवतमाळ - ९०१.५० रुपये

 • अमरावती - ८९३ रुपये

 • अकोला - ८८० रुपये

 • बुलडाणा - ८७४ रुपये

 • चंद्रपूर - ९०८.५० रुपये

 • वाशीम - ८८० रुपये

loading image
go to top