

Truck accident news
sakal
वानाडोंगरी: शालिनीताई मेघे हॉस्पिटल परिसरात ट्रकने तिघांना मागून धडक दिल्याने एकाचा मृत्यू, तर दोघे जखमी झाल्याची घटना रविवारी (ता. २०) दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. श्यामकृष्णन पी. पी. के. (वय २६) यांचा या अपघातात मृत्यू झाला. अमन के. पी. (वय २३) आणि श्रद्धा विकी वासेकर हे दोघे जखमी झाले असून, त्यांच्या पायांना फ्रॅक्चर झाले आहे.