Nagpur News : पोहायला गेले अन् अनर्थ घडला; तीन मित्रांचा पाण्यात बुडून मृत्यू

पाण्याने तुडूंब भरलेल्या खदाणीत तीन मित्रांचा बुडून मृत्यू झाला.
death
deathsakal

वणी (जि. यवतमाळ) - तालुक्यातील वांजरी परिसरात पाण्याने तुडूंब भरलेल्या खदाणीत तीन मित्रांचा बुडून मृत्यू झाला होता. त्या तिघांचे मृतदेह रविवारी (ता.तीन) सकाळी मिळाले. तिन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.

आसीम अब्दुल सलाट शेख (वय१६), नुमान शेख सादिर शेख (वय१६, रा. दोघेही एकतानगर) व प्रतीक संजय मडावी (वय१६, रा. प्रगती नगर) अशी मृतांची नावे आहेत. अवघे सोळा-सतरा वर्षीय तीन शालेय मित्र एकाच दुचाकीने वांजरी येथे फिरायला गेले होते.

वांजरी परिसरात गौण खनिज उत्खनन केल्यानंतर निर्माण झालेल्या मोठया खड्डयाला तलावाचे स्वरूप आले आहे. पावसामुळे त्यात तुडूंब पाणी साचले आहे. तेथे हे तिन्ही मुले दुचाकीने पोचली. त्यांना पोहण्याचा मोह झाला, आपले कपडे व अन्य साहित्य दुचाकीवर ठेवून ते पाण्यात उतरले आणि अनर्थ घडला.

पाण्याचा अंदाज न आल्याने ते तिघेही पाण्यात बुडाले. मात्र आजूबाजूला कोणीही नसल्याने त्यांचा मृत्यू झाला. सायंकाळी दुचाकीवर तिघांचे कपडे, चप्पल आढळून आल्याने प्रत्यक्षदर्शींच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. पोलिसांना पाचारण करण्यात आले. मात्र, रात्र झाल्यामुळे शोध घेता आला नाही.

घटनेची वार्ता शहरात वाऱ्यासारखी पसरली. ती मुले कोण आहेत याबाबत तर्कवितर्क लावल्या जात होते. घटनास्थळी मनसे नेते राजू उंबरकर, राष्ट्रवादीचे रज्जाक पठाण आपल्या कार्यकर्त्यांसह पोचले. ठाणेदार अजित जाधव यांनी तातडीने घटनास्थळ गाठले. रात्र झाल्यामुळे शोधमोहीम थांबविण्यात आली. रविवारी पहाटे पोलिस कर्मचारी व पालिकेचे भोलेश्वर ताराचंद यांच्या नेतृत्वात शोध घेतला असता तिन्ही मुलांचे मृतदेह आढळले.

मृत तिघेही मुले येथील एका महाविद्यालयात अकरावीत शिकत होते. मुलांना सोशल मीडियाचे फार वेड लागले आहे. विविध प्रकारे फोटो शूट करून इन्स्टाग्राम, फेसबुकवर टाकण्यात येते. यासाठी मुले शहराच्या आजूबाजूला रमणीय स्थळांच्या शोधात असतात. यामुळेच हे तिन्ही मुले वांजरीला तलावाचे स्वरूप आलेल्या खदानी जवळ गेले. फोटोशूट आणि शूटिंगमुळे तर अघटित घडले नाही ना, अशी चर्चा रंगत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com