
प्रभाग रचनेतील बदल आणि चार सदस्यीय प्रभाग पद्धतीच्या राज्य सरराकारच्या निर्णयाचे भाजपच्या नेत्यांनी स्वागत केले असून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी याचा निषेध नोंदवला आहे.
भाजप खुश, आघाडीचे नेते नाखुश
नागपूर - प्रभाग रचनेतील बदल आणि चार सदस्यीय प्रभाग पद्धतीच्या राज्य सरराकारच्या निर्णयाचे भाजपच्या नेत्यांनी स्वागत केले असून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी याचा निषेध नोंदवला आहे.
माजी पालकमंत्री तसेच भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडी सरकारने केलेली चूक नव्या सरकारने सुधारली असल्याचे सांगितले. आपणच चुकीच्या पद्धतीने व न्यायालयाच्या आदेशाच्या विरोधात जाऊन महापालिकांमधील सदस्य संख्या महाविकास आघाडी सरकारने वाढवण्याचे निदर्शनास आणून दिले होते. महाविकास आघाडीने आपल्या राजकीय सोयीने प्रभाग रचाना केल्याचा आरोपही बावनकुळे यांनी केला होता.
पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांनी चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने करण्याचा निर्णय स्वागत योग्य केले आहे. या निर्णयाने अनेक इच्छुकांना मोठा दिलासा मिळेल असा विश्वास व्यक्त केलाय ळालेला आहे. तीन ३ सदस्यीय प्रभाग रचनेमध्ये मोठ्या प्रमाणात तफावती होत्या. कुठे दोन महिला तर कुठे दोन पुरुष असल्यामुळे अनेक इच्छुक उमेदवारांना निवडणुकीपासून वंचित राहावे लागणार होते. चारच्या प्रभागामुळे अनेक सर्वपक्षीय कार्यकर्ते सुखावले आहेत तसेच ओबीसींना न्याय मिळेल, अशी आशा खोपडे यांनी व्यक्त केली.
लोकशाहीचा सन्मान - प्रवीण दटके
महाविकास आघाडीने आपल्या सोयीने प्रभागाचा निर्णय घेतला होता. लोकसंख्येचा अधिकृत आकाड न घेताच सदस्य संख्या वाढवली होती. ही चूक शिंदे-फडणवीस सरकारने सुधारली. भाजपच नव्हे तर अनेक पक्षांनी प्रभाग रचनेवर आक्षेप नोंदवले होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. लोकशाहीच्या सन्मानासाठी करण्यात आलेले फेरबदल स्वागताहार्य असल्याचे भाजपचे शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके यांनी सांगितले.
सावरबांधे यांनी नोंदवला निषेध
माजी उपमहापौर तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शेखर सावरबांधे यांनी या फेरबदालाचा निषेध केला. राज्य सरकारने महापालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांना आपल्या हातचे खळणे बनवले असल्याचा आरोप त्यांनी केला. वारंवार निर्णय बदलवले जात असल्याने खेळखंडोबा होत आहे. चारच्या प्रभागामुळे सामान्य घरातील कार्यकर्ता उपेक्षित राहतो, असे मत शेखर सावरबांधे यांनी व्यक्त केले.
Web Title: Ward Structure Changes Bjp Is Happy Leaders Of The Alliance Are Unhappy Politics
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..