Washim News:२२ वर्षांनी सुरु होणार बालाजी कारखाना? निविदा प्रक्रियेवरुन बँकेच्या भूमिकेकडे लक्ष

अल्पावधीतच राज्यात अव्वल स्थानी पोहचलेला बालाजी सहकारी साखर कारखाना कालांतराने संचालक मंडळातील वादामूळे बंद पडला. परंतू २२ वर्षानंतर पुन्हा एकदा बालाजी सहकारी साखर कारखाना सुरू होण्याची आशा पल्लवीत झाली आहे.
Washim News:२२ वर्षांनी सुरु होणार बालाजी कारखाना? निविदा प्रक्रियेवरुन बँकेच्या भूमिकेकडे लक्ष

Balaji Factory Tender Process News: अल्पावधीतच राज्यात अव्वल स्थानी पोहचलेला बालाजी सहकारी साखर कारखाना कालांतराने संचालक मंडळातील वादामूळे बंद पडला. परंतू २२ वर्षानंतर पुन्हा एकदा बालाजी सहकारी साखर कारखाना सुरू होण्याची आशा पल्लवीत झाली आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने न्यायालयीन निर्णयाच्या अधिन राहून सदर कारखाना भाड्याने देण्याची निविदा सूचना काढली होती. त्यानुसार बँकेकडे काही निविदा प्राप्त झाल्या असून त्यामधील एक निविदा माझ्याच नावाची असल्याचा दावा जिल्हा परिषद सदस्य पांडूरंग ठाकरे यांनी केला असून लवकरात लवकर कारखाना सुरू व्हावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

रिसोड तालुक्यातील मसला पेन या ठिकाणी बालाजी सहकारी साखर कारखाना सुरू करण्यात आला होता. जवळपास ३६० एकर जमीन कारखान्याकडे होती. पाच हजार भागधारक होते. जवळपास ७५० कर्मचारी व शेकडो मजूर कार्यरत होते. कारखान्याची अल्पावधीतच भरभराट होऊन कारखाना राज्यात अव्वल स्थानी पोहचला होता. कारखान्यांमध्ये केवळ जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातून ऊस येत होता. (Latest Marathi News)

कारखान्याची देदीप्यमान वाटचाल सुरू असतानाच संचालक मंडळात अचानक बेबनाव निर्माण झाल्याने कारखान्याची चाके थांबली. मात्र कारखाना सुरू व्हावा, यासाठी माझा प्रयत्न मागील अनेक वर्षापासून असल्याची माहिती पांडूरंग ठाकरे यांनी दिली.

Washim News:२२ वर्षांनी सुरु होणार बालाजी कारखाना? निविदा प्रक्रियेवरुन बँकेच्या भूमिकेकडे लक्ष
Ind vs Eng : विजयासाठी हव्या ९ विकेट ; गिलच्या शतकामुळे भारताला विजयाची आशा

महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेने दैनिक न्यायालयीन निर्णयाच्या अधिन राहून बालाजी सहकारी साखर कारखाना भाड्याने अथवा विक्रीबाबत निविदा सूचना काढून निविदा मागविल्या होत्या. त्यानुसार मी निविदा भरली असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य पांडूरंग ठाकरे यांनी दिली. तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेकडे विनंती करून सदर कारखाना लवकरात लवकर सुरू करावा, अशी मागणी केली असल्याची माहिती त्यांनी दिली. (Latest Marathi News)

बालाजी सहकारी साखर कारखाना सुरू व्हावा, यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील होतो. महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेने न्यायालयाच्या परवानगीच्या अधीन राहून बालाजी कारखाना भाड्याने देणेबाबत निविदा काढल्यानंतर मी निविदा भरली. न्यायालयाच्या अधीन राहून मला कारखाना भाड्याने दिल्यास कारखान्यास गतवैभव प्राप्त होईल. यासाठी मात्र जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व नेत्यांचे पाठबळ आवश्यक आहे- पांडूरंग ठाकरे, जिल्हा परिषद सदस्य

Washim News:२२ वर्षांनी सुरु होणार बालाजी कारखाना? निविदा प्रक्रियेवरुन बँकेच्या भूमिकेकडे लक्ष
Jharkhand Politics : झारखंडमधील सोरेन सरकार राहणार की 'गेम' होणार? आज होणार फ्लोर टेस्ट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com