Washim: जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना झाला होता फरार, ३६ वर्षांनंतर आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला आरोपी ३६ वर्षांपूर्वी फरार झाला होता. पोलिसांनी मोठ्या शिताफीने पकडून त्यास अटक केली आहे. मालेगाव पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Washim: जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना झाला होता फरार, ३६ वर्षांनंतर आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Culprit Arrested After 36 Year : जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला आरोपी ३६ वर्षांपूर्वी फरार झाला होता. पोलिसांनी मोठ्या शिताफीने पकडून त्यास अटक केली आहे. मालेगाव पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.


सन १९८७ पासून फरार असलेला कैदी गजानन पाचुराम ओझा (वय ६२ वर्षे, रा. मालेगाव) याच्या विरुद्ध पोलिस स्टेशन मालेगाव येथे अप क्र. ३०५९/२०१३ कलम २२४ भादवी नुसार गुन्ह्याची नोंद होती.

या गुन्ह्यातील आरोपीला ३६ वर्षानंतर मालेगाव येथील तपास पथक प्रमुख सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश धोत्रे, सहाय्यक पोलिस निरीक्षक रवि सैबेवार, पोलीस हवालदार कैलास कोकाटे, पोलीस हवालदार सुनिल पवार, पोलीस कॉन्स्टेबल अमोल पवार यांनी ठाणेदार संजय चौधरी यांच्या मार्गदर्शनात मिळालेल्या गोपनीय माहिती वरून २ फेब्रुवारी रोजी अकोला येथून ताब्यात घेऊन अटक केली आहे. मालेगाव पोलिस स्टेशनला नव्याने बदलून आलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश धोत्रे यांनी आतापर्यंत अशा अनेक क्लिष्ट गुन्ह्याची उकल केली आहे.

(Latest Marathi News)

Washim: जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना झाला होता फरार, ३६ वर्षांनंतर आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Grammy Awards 2024 : गौरवास्पद! शंकर महादेवन, झाकीर हुसेन यांनी जिंकला ग्रॅमी; येथे वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com