esakal | धक्कादायक! नागपूर जिल्हा परिषदेतल्या पाण्यात आढळल्या अळ्या.. कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

कोरोनामुळे आधीच कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यातच पिण्याच्या पाण्याच्या मशीनमधील दूषित पाण्यामुळे भीतीत आणखीणच भर पडली. सीईओंच्या दुर्लक्षामुळे कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

धक्कादायक! नागपूर जिल्हा परिषदेतल्या पाण्यात आढळल्या अळ्या.. कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

sakal_logo
By
नीलेश डोये

नागपूर : शुद्ध पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी असलेल्या जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील पाणीच पिण्यायोग्य नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

प्रादेशिक सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रयोगशाळेच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. कोरोनामुळे आधीच कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यातच पिण्याच्या पाण्याच्या मशीनमधील दूषित पाण्यामुळे भीतीत आणखीणच भर पडली. सीईओंच्या दुर्लक्षामुळे कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

जि.प.च्या नवीव न जुन्या दोन्ही इमारतीमध्ये पिण्याच्या पाण्याच्या जवळपास ९ मशीन (आरओ) लावण्यात आले आहेत. गेल्या ७ ऑगस्ट रोजी जि.प.च्या जुन्या इमारतीमधील शिक्षण विभागाच्या परिसरात लावण्यात आलेल्या पिण्याच्या पाण्याच्या मशीन (आरओ) मधून चक्क अळी असलेली पाणी आले.

ठाकरे सरकार हिंमत असेल तर माजी आमदारांवर ही कारवाई करून दाखवा...

यानंतर दुसऱ्याच दिवशी प्रशासनाकडून सर्व आरओ मशीनची तपासणी करून त्यातील पाण्याचे नमुने घेण्यात आले. हे नमुने प्रादेशिक सार्वजनकि आरोग्य प्रयोगशाळेमध्ये तपासणीकरिता पाठविले असता, त्यातील ९ मशीनपैकी ८ मशीनचे पाणी हे पिण्यायोग्य नसल्याचा अहवाल प्रयोगशाळेकडून देण्यात आला. यामुळे प्रशासन कर्मचाऱ्याबाबत किती गंभीर आहे, याची प्रचिती येते.

असे का घडले? - पती, मुलांना श्रद्धांजली वाहून ‘तिने’ संपवले जीवन, वाचा नेमके काय झाले

मशीन दुरुस्त करा

पिण्याच्या पाण्याच्या मशीनचे पाणी बंद करूर त्या दुरुस्त करण्याच्या निर्देश उपाध्यक्ष तथा आरोग्य समिती सभापती मनोहर कुंभारे यांनी दिले. आरओचे खराब झालेले साहित्य बदलवून त्यानंतर पुन्हा पाण्याचे नमुने घेत ते तपासणीकरिता पाठविण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले. 

संपादन - अथर्व महांकाळ 

loading image
go to top