एक मजूर चित्रपट अभिनेता बनतो तेव्हा... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एक मजूर चित्रपट अभिनेता बनतो तेव्हा...

एक मजूर चित्रपट अभिनेता बनतो तेव्हा...

sakal_logo
By
केतन पळसकर : सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कलेला कुठल्याही सीमा नसतात. ना गरीब ना श्रीमंत, शिक्षित अथवा अशिक्षित. शहरातील कलावंत देखील आपल्या एका सहकलाकाराबद्दल सध्या असाच एक अनुभव घेत आहेत. कलेप्रती ओढ असणाऱ्या हा कलावंत कुठल्याही मोठ्या घराण्यातील नाही, ना त्याने या विषयामध्ये शिक्षण घेतले आहे. तो आहे शहरातील झोपडपट्टीमध्ये राहणारा, मजुरी करून दोन वेळचे अन्न मिळविणारा नीरज जामगडे.

हेही वाचा: पटियाला मधुन लढणार कॅप्टन अमरिंदर सिंह; म्हणाले "मी पळून..."

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एका मराठी चित्रपटाच्या निमित्ताने तो पुन्हा एकदा चर्चेमध्ये आला आहे. दररोज कामासाठी भटकायचे, मिळेल तितके पैसे घरी न्यायचे आणि आपल्या छोट्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा, असा त्याचा दिनक्रम. ही ओळख फक्त मजुरी पुरती मर्यादित न ठेवता त्याने समाजामध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. कला क्षेत्रातील त्याच्या कामाची सुरवात शाळेमध्ये फावल्या वेळेत गाणे म्हणन्यापासून सुरू झाली. पुढे शाळेचा स्नेहमिलन सोहळा, गशेणोत्सवातील सांस्कतिक कार्यक्रमांमध्ये गाणे सादर करणे, एकपात्री कार्यक्रम सादर करणे आदी सुरु होते.

अशातच वृत्तपत्रातून त्याने नाट्य कार्यशाळे विषयी माहिती वाचली आणि त्याचा अभिनयाचा प्रवास सुरू झाला. विशेष म्हणजे मजुर म्हणून इतरांचे घर बांधता बांधता त्याच्या ह्दयामध्ये घर निर्माण केलेल्या कलेला त्याने जोपासले आहे.

हेही वाचा: संयुक्त किसान मोर्च्याकडून PM मोदींना खुलं पत्र; केल्या सहा मागण्या

निरजची घरची परीस्थीती पूर्वीपासूनच बेताची. कामठी रोडवरील पिवळी नदी परिसरातील झोपडपट्टीमध्ये त्याचे वास्तव्य आहे. सहाजिकच कला विषयाप्रती घरामध्ये कुठलीही जागृती नाही. त्याच्या या कलेच्या वेडापाई वस्तीतील नागरिक, नातेवाईक त्याच्यावर हसत असत. लोकांचे सततचे टोमणे ऐकून त्याच्या साध्याभोळ्या आईवडीलांनीसुद्धा त्याला खडसावले होते. ‘तुझ्याकडे ना चेहरा, ना पीळदार शरीर, ना पडद्यावर सुरेख दिसण्यासारखे तोंड, तुला कोण काम देईल?’ असे म्हणून म्हणून त्याला प्रत्येक जण डिवचत होता. परंतु, आप्तेष्ठांचे हेच शब्द लक्षात घेऊन त्याने हा प्रवास जिद्दीने सुरु ठेवला.

मजुरी करीत जोपासली कला

‘देसी निंजा (हिंदी, २०१९)’, ‘साथ तुझा भेटला (मराठी, २०१९)’, ‘जयंती (मराठी २०२१)’, राखोश (हिंदी, २०१९) यासह निरजने एकूण आठ ते दहा चित्रपटांमधून काम केले आहे. मजुरी करत करत त्याने चित्रपट, लघुपट, नाटक, महानाटक, एकपात्री, पथनाट्य, वेब सिरीज, फीचर फिल्म अशा विविध माध्यमातून आपली कला जोपासली आहे.

"मला लहान पणापासूनच कला क्षेत्राची ओेढ होती. वाचन, रेडिओ या माध्यमातून मी विविध मान्यवरांच्या यशाच्या कथा ऐकायचो. ही मंडळी सगळा व्याप सांभाळून जीवनामध्ये यश संपादन करू शकत असल्यास आपण मजुरी सांभाळून आपली कला नक्कीच जोपासू शकू, असा विश्‍वास माझ्यामध्ये निर्माण झाला."

-नीरज जामगडे, कलावंत

loading image
go to top