Article 370 : जम्मू-काश्मीर या राज्याला विशेष राज्याचा दर्जा देणारं कलम ३७० मोदी सरकारनं रद्द केल्यानंतर या निर्णयाला काँग्रेसकडून सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलं होतं. कलम ३७० रद्द करण्याची प्रक्रिया चुकीची असल्यानं घटनाबाह्य असल्याचं या आव्हान याचिकेत म्हटलं होतं. पण सुप्रीम कोर्टानं ही याचिका फेटाळत कलम ३७० रद्द करण्याचा सरकारचा निर्णय योग्यचं असल्याचा निर्णय दिला होता. सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठानं एकजुटीनं हा निर्णय देण्यामागचं नेमकं कारण काय होतं? याचा खुलासा सरन्यायाधीश भूषण गवई यांनी नागपुरात एका भाषणात केला.