दहनघाटांवर कोरोनाबळींच्या अंत्यसंस्काराला का होतोय विरोध? वाचा सविस्तर

Why people took objection on cremation of corona victim at the crematorium?
Why people took objection on cremation of corona victim at the crematorium?
Updated on

नागपूर : शहरात दररोज चाळीसपेक्षा अधिक कोरोनाबाधितांचा मृत्यू होत असून त्यांच्यावर अंत्यसंस्काराचा भार केवळ तीनच घाटांवरील शवदाहिनीवर आहे. शवदाहिनी एकच असल्याने घाटावर पार्थिवाची रांग लागत आहे. एवढेच नव्हे तर अंत्यसंस्कारादरम्यान वापरण्यात येणाऱ्या पीपीई किट थेट घाटाच्या आवारातच फेकून देण्यात येत आहे.

त्यामुळे परिसरातील नागरिक कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे कोरोनाबाधितांच्या अंत्यसंस्कारास विरोध करीत असल्याची धक्कादायक बाब पुढे आल्याने कोरोनाने मानवी संवेदनाही बोथड केल्या की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरात कोरोनाबळींच्या वाढत्या संख्येने महापालिकेपुढे वेगवेगळी आव्हाने उभी केली आहे. यात आता कोरोनाबळींच्या अंत्यसंस्काराच्या आव्हानाचा समावेश होत आहे.

पुढील काही दिवसांत तयारी न केल्यास महापालिकेपुढे नागरिकांच्या संतापाचे मोठे संकट उभे राहण्याची शक्यता आहे. दररोज चाळीसवर कोरोनाग्रस्तांचा मृत्यू होत आहे. यात शहर व ग्रामीण भागातील किंवा जिल्ह्याबाहेरील कोरोनाबळींचाही समावेश आहे. या सर्वांच्या पार्थिवावर शहरातील दहनघाटांवर शास्त्रीय पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात येत आहे.

कोरोनाबळींचे पार्थिव शवदाहिनीमध्येच जाळण्याचे बंधनकारक आहे. शहरात १६ घाट असून वैशालीनगर, गंगाबाई घाट व अंबाझरी घाटांवरच शवदाहिनी उपलब्ध आहे. दररोज चाळीस जणांचा कोरोनाने मृत्यू होत असल्याने या घाटांवर अंत्यसंस्कारासाठी त्यांचे पार्थिव येत आहे. शवदाहिनीमध्ये एक पार्थिव जळण्यास तीन तासांचा अवधी लागत असल्याचे महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने नमुद केले.

त्यामुळे एकापेक्षा जास्त पार्थिव अंत्यसंस्कारासाठी आणल्या गेल्यास घाटांवर पार्थिवाची रांग लागत आहे. काही वेळ पार्थिव जाळण्यासाठी नातेवाईकांना प्रतीक्षा करावी लागत आहे. पार्थिव बराच काळ घाटांवर राहात असल्याने गंगाबाई घाट परिसरात नागरिकांचा विरोध सुरू झाला आहे. याशिवाय मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्यानंतर सफाई कर्मचाऱ्यांकडून पीपीई किट घाटाच्या आवारातच मोकळ्या जागेवर फेकण्यात येत असल्याने गंगाबाई घाट परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.

मृतदेहांची संख्या वाढत असताना केवळ तीनच घाटांवर अंत्यसंस्काराचा भार आहे. विशेष म्हणजे बाहेर गावावरून आलेल्या कोरोनाबाधितांची मृत्यू झाल्यास त्यांचेही पार्थिव येथेच जाळण्यात येत आहे. त्यामुळेही नागरिकांनी विरोध करण्यास सुरुवात केली. नुकताच महापालिका अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या बैठककीत आमदार प्रवीण दटके यांनी बाहेरगावच्या पार्थिवासाठी पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी केली होती.  त्यामुळे महापालिकेला आता इतर घाटांवरही शवदाहिनी सुरू करण्याची मागणी वाढत आहे. 

गंगाबाई घाटानजिक दोनशेवर कुटुंब राहतात. कोरोनाबळींचे अनेक मृतदेह एकाचवेळी येत असल्याने नागरिकांत भीती निर्माण झाली आहे. अंत्यसंस्कारानंतर कर्मचारी पीपीई किट उघड्यावर टाकून देतात. या वापरलेल्या पीपीई किट घेऊन जाण्यासाठी येणाऱ्या विशेष वाहनातील कर्मचारी उघड्यावरील पीपीई किटला हातही लावत नाही. केवळ कॅरीबॅग किंवा डस्टबीनमधील किट नेतात. त्यामुळे त्या पीपीई किट पडून राहतात. यातून परिसरात कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका आहे. महापालिकेने एकाचवेळी अनेक मृतदेह येथे आणण्याऐवजी इतर घाटांचाही विचार करावा.
बल्लू शहारे, गंगाबाई घाट परिसरातील निवासी.
 
शहरात १६ घाट आहेत. यातील गंगाबाई घाट, अंबाझरी आणि वैशालीनगर घाटांवर शववाहिनी उपलब्ध आहे. अंबाझरी घाटांवर एलपीजी शवदाहिनी आहे. सद्यस्थितीत मानेवाडा व सहकारनगर घाटांवर शवदाहिनीचे काम अंतिम टप्प्यात आहे.
डॉ. प्रदीप दासरवार, उपायुक्त, महापालिका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com