esakal | ‘गुच्छी‘चे दर किलोला तीस हजार तरीही संपते हातोहात, जाणून घ्या कारणे...
sakal

बोलून बातमी शोधा

the wild mushroom are very costly

संधिवात, मूळव्याध, मधुमेह, कर्करोग यांसारख्या व्याधींसाठीच्या औषधांमध्ये अळिंबीचा वापर केला जात असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

‘गुच्छी‘चे दर किलोला तीस हजार तरीही संपते हातोहात, जाणून घ्या कारणे...

sakal_logo
By
प्रशांत राॅय

नागपूर : भाजीपाल्याचे दर थोडेबहुत वधारले की नागरिकांकडून बजेट कोलमडल्याची ओरड होते. भारतात श्रावण महिन्यात भाजीपाल्याचे दर वधारलेले असतात.या परिस्थितीत जर सांगितले एक भाजी अशीही आहे की ती ३० हजार रुपये प्रतिकिलोने विक्री केली जाते आणि लोकं मोठ्या आनंदाने, उत्साहाने ती खरेदीही करतात तर विश्वासच बसणार नाही. परंतु हे सत्य असून केवळ काही मर्यादित दिवसांमध्ये उपलब्ध होणारी ही भाजी बाजारात येताच हातोहात संपते. 

चर्चा तर होणारच! रंगीत कापुस ठरणार गेम चेंजर...

ही वनस्पती म्हणजे मशरूम (अळिंबी). ही मुख्यत्वे हिमालयाच्या पायथ्याशी, हिमाचल, उत्तरांचल आणि जम्मू काश्मीरमध्ये उगवते. जंगलात आढळणाऱ्या या अळिंबिचे नाव ‘गुच्छी‘ असे आहे. या अळिंबिच्या उच्च किमतीचे कारण म्हणजे याला असलेली मागणी आणि कमी उपलब्धता. ही अळिंबी केवळ येथील थंड प्रदेशातच येते. याचे काही औषधी गुणधर्मही आहेत.

सध्या ती काय करते? 'स्वदेश' फेम गायत्री जोशीची कहाणी, वाचा...

या अळिंबीप्रमाणेच झारखंड आणि छत्तीसगड या दोन राज्यातही एका विशिष्ट अळिंबीचे उत्पादन घेतले जाते. छत्तीसगडमध्ये या विशिष्ट जातीच्या अळिंबीला `खुकडी तर झारखंडमध्ये ‘रुईडा‘ म्हणून ओळखले जाते. ही अळिंबी बाजारात आल्याबरोबर हातोहात विकली जाते. या अळिंबीला किमान १२०० रुपये प्रतिकिलो दर मिळतो. बलरामपूर, सूरजपूर, सुरगुजा, छत्तीसगडसह उदयपूरला लागून असलेल्या कोरबा जिल्ह्याच्या जंगलात एन पावसाळ्याच्या दिवसात नैसर्गिक कोरड असते. जी या वैशिष्ट्यपूर्ण अळिंबीच्या वाढीसाठी उपयुक्त ठरते.

वा रे पठ्ठे...शाळेलाच पाठवले ऑनलाइन क्लासेसचे बिल

या अळिंबीमध्ये प्रोटीनचे (प्रथिने) प्रमाण जास्त आहे. शिवाय विविध औषधी गुणधर्म असल्याची धारणा असल्यामुळे या अळिंबीला मोठी मागणी आहे. सामान्यांपासून ते डायटवेडे हाय क्लास नागरिकही तेवढ्याच आवडीने अळिंबी खातात. यामुळे बाजारातही तिला मोठी मागणी आहे. अगदी साध्या ढाब्यापासून पंचतारांकित हॉटेलांमध्ये अळिंबीने आपला चाहता वर्ग निर्माण केला आहे. वाढत्या मागणीमुळे अनेकदा वनवासी किंवा जंगलाशेजारील लोक ही अळंबी साठवूनही ठेवतात. मात्र तज्ज्ञांच्या मते काढल्याबरोबर ही अळिंबी दोन दिवसात वापरणे अधिक योग्य आहे. 

असे आहेत औषधी गुणधर्म 
संधिवात, मूळव्याध, मधुमेह, कर्करोग यांसारख्या व्याधींसाठीच्या औषधांमध्ये अळिंबीचा वापर केला जात असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ या जीवनसत्त्वांनी युक्त असलेल्या अळिंबीत मानवी शरीरासाठी आवश्यक १८ अमिनो आम्ल उपलब्ध असल्याचा दावाही शास्त्रज्ञांनी केलेला आहे. 

जर्मन लोकं अळिंबीचे ‘फॅन' 
अळिंबी वनस्पती पावसाळ्यात निसर्गतःच उगवते. ही बुरशी गटातील वनस्पती आहे. ही कुत्र्याची छत्री, भूछत्र, तेकोडे, धिंगरी या नावाने ओळखली जाते. निसर्गात अनेक प्रकारचे मशरूम आढळतात; त्यांत काही विषारीदेखील असतात. जगात मशरूमच्या १२,००० हून अधिक जाती आहेत. मशरूमची लागवड प्रामुख्याने पूर्व आशिया, तैवान, चीन, कोरिया, इंडोनेशिया या देशांत करतात. या वनस्पतीचे २०१७ सालचे जागतिक उत्पन्न ८५ लाख मेट्रिक टन आहे. त्यापैकी ५५% युरोपात, २७% उत्तर अमेरिकेत व १४% पूर्व आशिया खंडात घेतात. मशरूमचे सर्वाधिक सेवन जर्मनीमध्ये होते. 

(संपादन : प्रशांत राॅय)

loading image
go to top