Winter Session : वाहनांवर होणार कोट्यवधींचा खर्च; ५०० वाहने घेणार भाडेतत्वावर

नागपुरात होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी शेकडो कोटींचा खर्च केला जातो.
Winter Session
Winter Sessionsakal

नागपूर - नागपुरात होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी शेकडो कोटींचा खर्च केला जातो. येथे येणारे मंत्री, आमदार, अधिकाऱ्यांसाठी निवास व जेवणासोबत वाहनांची सोय करण्यात येत आहे. त्यांच्यासाठी ५०० वाहनांची व्यवस्था करण्यात येणार आहे. यावर कोट्यवधींचा खर्च होणार आहे. दोन कंपन्यांना वाहनाचे कंत्राट देण्यात आल्याची माहिती आहे.

७ डिसेंबर ते २० डिसेंबरदरम्यान अधिवेशनाचे कामकाज चालेल. याकाळात मंत्री, आमदार, अधिकारी यांच्यासाठी वाहनव्यवस्था करण्यात येणार आहे. काही शासकीय वाहन अधिग्रहीत करण्यात येणार असू,न काही वाहन किरायाणे घेण्यात येणार आहे. स्विफ्ट डिझायर, इटिऑस, इंडिका, इंडिगो, विस्टा या एसी वाहनासाठी प्रती दिवस प्रती वाहन २६९० रुपये आणि १५ दिवसांकरिता प्रती वाहन ४०,४८५ रुपये असे दर निश्चित करण्यात आले आहे.

तसेच इनोव्हा क्रिस्टा या वाहनासाठी प्रती दिवस प्रती वाहन ४२९० रुपये आणि १५ दिवसांकरिता प्रती वाहन ६४,४८५ रुपये असे दर ठरविले आहे. त्याचप्रमाणे इनोव्हा एसी गाडीसाठी प्रती दिवस प्रती वाहन ४०९०, तर १५ दिवसांकरिता प्रती वाहन ६१,४८५ रुपये दर ठरविला आहे. तर टाटा सूमो, स्कॉर्पिओ, टवेरा या नॉन एसी गाड्या प्रती दिवस प्रती वाहन ३१५०, तर १५ दिवसांकरिता प्रती वाहन ४७,६४० रुपये या दराने निश्चित केल्या आहेत.

टाटा सूमो, स्कॉर्पिओ, टवेरा या एसी गाड्या प्रती दिवस प्रती वाहन ३२९०, तर १५ दिवसांकरिता प्रती वाहन ४९,४८५ रुपये या दराने ठरविल्या आहेत. करोला, होंडा सिटी, मारुती सीआज या गाड्यांसाठी प्रती दिवस प्रती वाहन ४७००, तर १५ दिवसांकरिता प्रती वाहन ७१,७९० रुपये दर निश्चित केले आहेत. सचिवालय नागपुरात जेव्हा येईल, तेव्हापासून गाड्यांचे काम सुरू होईल. १५ दिवसांच्या हिशोबाने या गाड्यांचे बिल दिले जाईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com