

Tension Mounts as Farmers Continue Agitation Against Shaktipith Project
sakal
उमरखेड : ‘शक्तिपीठ‘ महामार्गाला उमरखेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी प्रचंड विरोध सुरु केला आहे. काल सोमवारी बेलखेड येथील शेतकर्यांनी विरोध केला असताना आज (ता. १०) करोडी आमला शेतशिवारात मोजणीसाठी गेलेल्या टीमला शेतकर्यांनी अडविले, त्यामुळे पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांसमक्ष एका शेतकऱ्याने विषारी औषध घेण्याचा प्रयत्न केला तर काहींनी पैनगंगा नदीत आत्महत्या करण्याचा ईशारा दिला.