esakal | प्रियकराने पतीला पाठविले अश्लील फोटो अन् व्हिडिओ, घटस्फोटानंतर प्रेयसीची आत्महत्या
sakal

बोलून बातमी शोधा

crime news

प्रियकराने पतीला पाठविले अश्लील फोटो अन् व्हिडिओ, घटस्फोटानंतर प्रेयसीची आत्महत्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : प्रेयसीचे अन्य युवकाबरोबर लग्न झाल्यामुळे चिडलेल्या प्रियकराने तिचे नको त्या अवस्थेत फोटो आणि व्हिडिओ तिच्या पतीला पाठवले. त्यामुळे महिलेला पतीने घटस्फोट दिला. आयुष्य बरबाद केल्यानंतर लग्न करण्याचे आमिष देऊन लग्नास टाळाटाळ केल्यामुळे घटस्फोटीत प्रेयसीने गळफास घेऊन (nagpur crime) आत्महत्या केली. याप्रकरणी नवीन कामठी पोलिसांनी महिलेच्या प्रियकराविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. अमेरुद्दीन फैज्जुद्दीन अन्सारी (वय ३१ रा.कामगारनगर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या प्रियकराचे नाव आहे.

हेही वाचा: कर्जाला कंटाळून मुलीचा खून ; आई-वडिलांची आत्महत्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरुद्दीन अन्सारी याने २६ वर्षीय तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तिचे नको त्या अवस्थेत त्याने फोटो काढले. तिला लग्नाचे आमिष दाखवले. परंतु, लग्नास टाळाटाळ करीत असल्यामुळे तिच्या कुटुंबियांनी तिचे दुसरीकडे लग्न लावून दिले. त्यामुळे अमेरूद्दीन चिडला. त्याने प्रेयसीचे अश्‍लील फोटो आणि व्हिडिओ प्रेयसीच्या पतीच्या व्हॉट्सॲप केले. त्यामुळे महिलेच्या पतीने तिला घटस्फोट दिला. अमेरुद्दीन याने फोटो आणि व्हिडिओच्या आधारे महिलेचे लैंगिक शोषण केले. त्यानंतर तिला लग्नास टाळाटाळ केली. त्यामुळे ६ ऑगस्टला महिलेने पंख्याला ओढणी बांधून गळफास घेतला. नवीन कामठी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला. तपासादरम्यान अमेरुद्दीन याच्या छळाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचे समोर आले. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

loading image
go to top