esakal | ...अन् खाऊ आणायला गेलेली आई परतलीच नाही
sakal

बोलून बातमी शोधा

...अन् खाऊ आणायला गेलेली आई परतलीच नाही

...अन् खाऊ आणायला गेलेली आई परतलीच नाही

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर : आई आणि तिची किमया सर्वतोपरी... आईची काळजी आणि पाल्यांप्रति असलेले तिचे समर्पण याची साधी व्याख्याही कुणी करू शकत नाही. निसर्गाप्रमाणेच आईचे प्रेमही तेवढेच पवित्र... पावसाळ्याच्या दिवसातही शहरात उष्मा वाढला आहे. अशातच मुलांना तहान आणि भूक लागली म्हणून रेल्वेतून उतरलेली आई पुन्हा गाडीत चढलीच नाही. गाडी सुरू झाली अन् मुले आईच्या आशेने विव्हळत होती. तिकडे आई जीवनाशी संघर्ष करीत होती. अखेर तिने मेयो रुग्णालयात प्राण सोडले. नियती डाव साधून असेल तर कुणी काय करणार? अशीच काहीशी घटना नागपूर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक दोनवर घडली. (Woman-dies-at-Nagpur-railway-station)

बहीण गर्भवती असल्यामुळे दुसरी बहीण तिच्या काळजीपोटी, देखभालीसाठी काजीपेठला निघाल्या. यासाठी त्या दानापूर-सिकंदराबाद या विशेष रेल्वेगाडीने काजीपेठला जात होत्या. त्यांच्यासोबत त्यांची सात आणि दहा वर्षांची दोन मुले होती. याव्यतिरिक्त १८ वर्षीय भाऊदेखील होता. रेल्वेचे रिझर्व्हेशन मिळाल्यानंतर त्या दानापूर-सिकंदराबाद या विशेष रेल्वेगाडीच्या कोच क्रमांक एस ८ च्या बर्थ क्रमांक १७ आणि १८ वरून प्रवास करीत होते.

हेही वाचा: चंद्रपूर : गॅस गळतीमुळे एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू

दरम्यान, ही गाडी नागपूर स्थानकावर ११.१० वाजता पोहोचली. लांबच्या प्रवासात मुलांनी काहीही खाल्ले नसल्याने त्यांना भूक लागली होती. शिवाय, नागपूरसह विदर्भात उष्मा वाढल्यामुळे चिमुकल्यांचा गळाही कोरडा झाला होता. परिणामी, मुलांची भूक आणि तहान भागविण्यासाठी सविता राणी या नागपूर रेल्वे स्थानकावर उतरल्या. परंतु, त्यांचे तिकीट ज्या गंतव्यस्थानावरचे होते तेथे न पोहोचता त्यांनी थेट इहलोकाचा निरोप घेतला.

तोल जाऊन फलाटावर आदळल्या

भुकेल्या आणि तहानलेल्या मुलांसाठी खाद्यपदार्थ विकत घेत असतानाच गाडी निघाली. गाडी निघाल्याचे बघता अनेक प्रवासी गाडीकडे धावले. प्रवासी धावत्या गाडीत चढण्याचा प्रयत्न करीत होते. असाच प्रयत्न सविता राणीसुद्धा करीत होत्या. परंतु, त्यांना तसे जमले नाही. धावत्या रेल्वेगाडीत चढत असताना त्यांचा तोल जाऊन फलाटावर आदळल्या. यातच त्यांच्या छाती, खांदा आणि कंबरेला मुका मार लागला.

हेही वाचा: लग्नघरातच संपूर्ण कुटुंबाचा अंत; हळदही न निघालेल्या दाम्पत्याचाही मृत्यू

उपस्थितांचेही डोळे पाणावले

फलाटावर जखमी अवस्थेत पडलेल्या सविता राणी यांची प्रकृती बघता लगेच त्यांना उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान दुपारी एक वाजता त्यांचा मृत्यू झाला. अचानक आई निघून गेली. बघता लहान मुलांवर ओढवलेले हे दु:ख आभाळाएवढेच होते. या चिमुकल्यांचे चेहरे पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले होते.

(Woman-dies-at-Nagpur-railway-station)

loading image