online fraud
online fraudonline fraud

विदेशी पत्नीच्या नादात ४० लाख गमावले, मॅट्रीमोनी साईटवरून घडला प्रकार

नागपूर : मॅट्रीमोनी वेबसाईटवर (matrimony website) प्रोफाईल टाकून वधुसंशोधन करीत असतानाच चक्क विदेशात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या मुलीला प्रोफाईल आवडला. तिने थेट मोबाईल क्रमांक मागून चॅटिंग सुरू केली. विदेशी बायको भेटणार म्हणून युवक हुरळून गेला. मात्र, त्या युवतीने टोळी तयार करून पद्धतशीरपणे जाळ्यात ओढले. त्याला विदेशातून लॅपटॉप, मोबाईल आणि चक्क एक लाख डॉलर्स पाठविण्याचा बहाणा करीत युवकाला तब्बल ४० लाखांनी गंडा घातला. लग्नासाठी बघितलेली बायकोही गमावली आणि घरात होते नव्हते ते पैसेही गमावले. हा प्रकार बेलतरोडीत (beltarodi police nagpur) उघडकीस आला असून युवकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी लग्नासाठी बघितलेल्या युवतीसह तिच्या टोळीतील १५ जणांवर गुन्हा दाखल केला. (woman fraud of 40 lakh rupees with man through matrimony website)

online fraud
लेखी आश्वासनानंतरचं अविनाशवर अंत्यसंस्कार; रेस्क्यू टीम दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समत सोसायटी, गोकुल पार्कमागे, मनिषनगर येथे राहणारे सुशील देऊळकर हे पूजापाठ आणि शेती करतात. सुशीलचे लग्न करायचे असल्याने त्याच्या नातेवाईकांनी मुली पहायला सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी ७ सप्टेंबर २०१९ रोजी भारत मॅट्रीमोनी या वेबसाईटवर सुशील या नावाने खाते तयार केले. या माध्यमातून न्यू जर्सी (यूएसए) येथे राहणाऱ्या सुचिता दास या युवतीसोबत त्यांची ओळख झाली. सुशिल याला पाठविलेली रिक्वेस्ट सुचिताने मान्य केली. दहा ते पंधरा दिवस ती सुशिलशी अतिशय प्रेमाने बोलली. संबंध वाढल्यानंतर सुशिलने ‘तुमच्याकडे मोबाईल अतिशय स्वस्तात मिळतात’ असे सूचिताला म्हटले. त्यावर सुचिताने ‘तुम्ही धार्मिक लोक आहात. पूजापाठ करता. तुम्हाला दान देणे हे आमचे कर्तव्य आहे. त्यासाठी मोबाईल, लॅपटॉप आणि एक लाख यूएसए डॉलर पाठवितो’ असे म्हटले. हे ऐकून सुशिलला यांना लॉटरी लागल्याचा भास झाला.

डॉलर्स पाठविल्याचा फोन -

न्यू जर्सी येथील ऑस्टिन व्हाईट या युवकाने सुशिलला फोन करून मोबाईल, लॅपटॉप आणि एक लाख डॉलर पाठविल्याचे सांगून दिल्ली येथील विमानतळावरून माल ताब्यात घ्या, असे सांगितले. दरम्यान, दिल्ली येथील महिमा शर्मा, प्रसतो अधिकारी, नदीमखान, शंकरकुमार द्विवेदी, भोलानाथ, अजय शहा, ओमपालसिंग, सुशील नागर, फिरदोस, अजयकुमार, विक्रम सैनी, ताराचंद लुहार, जॉर्ज अपोलिनरी, आलीम आमीन, दीपक यांनी वेळोवेळी सुशिल याच्याशी संपर्क साधला.

सामान सोडविण्यासाठी प्रक्रिया -

यूएसएवरून आलेले पार्सल सोडविण्यासाठी वेगवेगळे कारणे सांगून सुशिलला बँकेत पैसे भरण्यास सांगितले. दरम्यान, सुशिल यांनी एनईएफटी आणि आरटीजीएस यूपीआयद्वारे काही पैसे पाठविले. परंतु, त्यांना पार्सल मिळाले नाही. आरोपी मात्र, वेगवेगळी कारणे सांगून त्यांना पैशाची मागणी करीत होते. त्यामुळे सुशिल यांना संशय आला. त्यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियात संपर्क करून माहिती विचारली असता ही फसवणूक असल्याचे त्यांना सांगण्यात आले.

४० लाख गमावले पैसे -

सुशिल यांनी आरोपींसोबत संपर्क करून भारत मॅट्रोमनी ही साईट खोटी असून तुम्ही मला लुबाळल्याची तक्रार केली. मात्र, तोपर्यंत सुशिल यांनी आरोपींना ४० लाख ६४ हजार ८५३ रुपये आरोपींना दिले होते. त्यानंतर सुशिल यांनी आरोपींच्या मोबाईल आणि ई मेलवर संपर्क केला असता ते बंद असल्याचे लक्षात आले. सुशिलने बेलतरोडी पोलिस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी तपास करून शेवटी आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com