

Fake Birth and Death Entries Trigger Administrative Stir in Maharashtra
Sakal
उमरखेड (जि. यवतमाळ) : तालुक्यातील भवानी रामपूर तांडा येथे सहा हजार दोनशे जन्माच्या, तर दोन मृत्यूच्या बोगस नोंदी आढळून आल्या आहेत. हा प्रकार १९९० पासून २०२५ पर्यंत झाला आहे. या प्रकारामुळे प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे. या नोंदी रद्द करण्याची तयारी जिल्हा आरोग्य विभागाने सुरू केली आहे.