

Yavatmal Bus Fire: Presence of Mind by Driver Prevents Disaster
Sakal
यवतमाळ : पुण्याहून यवतमाळकडे २७ प्रवासी घेऊन निघालेल्या चिंतामणी ट्रॅव्हलच्या आराम बसने अचानक पेट घेतला. प्रसंगावधान राखून चालकाने बस सुरक्षित ठिकाणी थांबवली आणि प्रवाशांना बाहेर काढले. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांत बस खाक झाली. जालना-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील शेलगावजवळ (ता. बदनापूर) मंगळवारी (ता. २७) पहाटे तीनच्या सुमारास ही घटना घडली.