Yavatmal: एकतर्फी प्रेमातून महिलावर चाकूने वार! पत्रामुळे अडकला आरोपी, पोलिसांनी १२ तासांत आवळल्या मुसक्या

एकतर्फी प्रेमातून महिलेवर एका अज्ञात व्यक्तीने चार ते पाचवेळा चाकूने वार केले. या आरोपीला पोलिसांनी १२ तासांच्या आत अटक केली .
Yavatmal: एकतर्फी प्रेमातून महिलावर चाकूने वार! पत्रामुळे अडकला आरोपी, पोलिसांनी १२ तासांत आवळल्या मुसक्या

Yavatmal Crime: शहरातील वॉर्ड क्रमांक सातमध्ये राहणाऱ्या एका महिलेवर शनिवारी (ता.१६) सकाळी सातच्या सुमारास अज्ञात हल्लेखोराने चाकूने चार ते पाच वार करून गंभीर जखमी केले व पळून गेला. या हल्लेखोराला महागाव पोलिसांनी बारा तासांत अटक केली.

गंभीर जखमी महिलेस शेजाऱ्यांनी यवतमाळ शासकीय रुग्णालयात दाखल केले. ह्या घटनेची तक्रार जखमी महिलेचे नातेवाईक सुरेश कांबळे यांनी महागाव पोलिस ठाण्यात दिले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घटनेचे गांभीर्य ओळखून ठाणेदार एस. एम. जाधव यांनी पथक तयार करून रवाना केले.

आरोपीची माहिती घेत असताना पोलिसांना माहिती मिळाली की एका अज्ञात व्यक्तीने काही दिवसांपूर्वी याच महिलेला पत्र पाठविले होते. त्या पत्राचा पोलिसांनी शोध घेतला असता ते पत्र हे हिंगोली जिल्ह्यातून आल्याचे कळले. परंतु, पत्रावर आरोपीने खोटे नाव टाकले होते. बनावट नाव व पत्ता यांचा पोलिसांनी तांत्रिक तपास करून आरोपी मारोती हैसाजी खंडारे याला हिंगोली येथे जाऊन सापळा रचून अटक केली.

पोलिसी खाक्या दाखविताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. सदर कृत्य त्याने एकतर्फी प्रेमातून केल्याची कबुली दिली. ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनात ठाणेदार जाधव, पोउपनि के. जी. पुंजरताड, सूरज काळे, पोउपनि, सागर आन्नमवार, वैसीम शेख, कैलास मुखाडे, अमोल भगत यांनी पार पाडली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com