Yavatmal: २८ वर्षीय तरुणासाठी दारुचा घोट ठरला अंतिम ! झोपेतच झाला मृत्यू, कारण अद्याप अस्पष्ट

दारु पिऊन आलेल्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. यामागील कारण अद्याप अस्पष्ट आहे.
Yavatmal: २८ वर्षीय तरुणासाठी दारुचा घोट ठरला अंतिम ! झोपेतच झाला मृत्यू, कारण अद्याप अस्पष्ट
esakal

Yavatmal News: तालुक्यातील आजंती येथे २८ वर्षीय युवकाचा झोपेतच अचानक मृत्यू झाला. गणेश देवबा खंडारे (रा. कवठा, ता. रिसोड) असे मृत युवकाचे नाव आहे.
पोलिस सूत्रांनुसार, गणेश देवबा खंडारे हा त्याचे आजोबा (आईचे वडील) रामचंद्र इंगळे (वय७९, रा. आजंती, ता. नेर) यांच्याकडे शुक्रवारी (ता.२९) आला होता.

तेव्हा तो मद्य पिऊन होता. दुसऱ्या दिवशी शनिवारी (ता.३०) तो सिरसगावच्या बाजारात गेला. तिथेही भरपूर मद्य सेवन केले. रात्री घरी येऊन झोपला तर उठलाच नाही. सकाळी आजोबा इंगळे यांना तो उठत नसल्याचे लक्षात आले. तेव्हा त्यांनी शेजारच्यांना बोलाविले. तेव्हा तो मरण पावल्याचे लक्षात आले.

आजोबांनी ही माहिती नेर पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. त्याचा मृत्यू नेमका कशाने झाला, हे उत्तरीय तपासणी अहवालावरूनच स्पष्ट होईल. पुढील तपास ठाणेदार बाळासाहेब नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. (Latest Marathi News)

Yavatmal: २८ वर्षीय तरुणासाठी दारुचा घोट ठरला अंतिम ! झोपेतच झाला मृत्यू, कारण अद्याप अस्पष्ट
...तर 50-50 टक्के जागा लढवू; प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीला स्पष्टच सांगून टाकलं

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com