

Young Farmer’s Nationwide Journey to Preserve 600 Indigenous Seed Varieties
sakal
-चेतन बेले
नागपूर: ‘जुनं ते सोनं‘ या विचाराला मनापासून कवटाळत एका ध्येयवेड्या तरुण शेतकऱ्याने देशी बियाण्यांचे संवर्धन करण्याचा अनोखा वसा घेतला आहे. आधुनिक शेतीच्या धावपळीत हरवत चाललेल्या पारंपरिक बीजसंपदेचे जतन करत त्याने तब्बल ६०० देशी बियाण्यांची बीज बँक उभारली आहे. या कार्यामागे केवळ शेती नव्हे, तर भविष्यातील पिढ्यांसाठी आरोग्यदायी अन्नसुरक्षा जपण्याची तळमळ दडलेली आहे.