Nagpur News : प्रियकराचे लग्न दुसऱ्या मुलीशी ठरल्याचा राग; तरुणीने संपवले जीवन, प्रियकराविरुद्ध गुन्हा

लग्नाचे आमीष दाखवून रमजान घोटी येथील एका तरुणीऩे प्रियकराने लैंगिक शोषण करुन दुसऱ्याच मुलीशी लग्न जुडल्यामुळे आत्महत्या केली. देवलापार पोलिस स्टेशन येथे या घटनेतील प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
young girl end her life due to her boyfriend getting married police
young girl end her life due to her boyfriend getting married policeSakal

देवलापार : लग्नाचे आमीष दाखवून रमजान घोटी येथील एका तरुणीऩे प्रियकराने लैंगिक शोषण करुन दुसऱ्याच मुलीशी लग्न जुडल्यामुळे आत्महत्या केली. देवलापार पोलिस स्टेशन येथे या घटनेतील प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

लोकेश मारबते (रा.धारगाव भंडारा, ह.मु.मोझरी अमरावती) असे आरोपीचे नाव आहे. पोलिस स्टेशन देवलापार येथून प्राप्त माहितीनुसार तरुणी ही मागील पाच सहा वर्षांपासून अमरावती जिल्ह्यातील नांदगाव येथे सुर्यलक्ष्मी सुतगिरणी नावाच्या कंपनीमध्ये काम करीत होती.

त्या कंपनीशेजारी एका पावर हाउस कंपनीमध्ये काम करणारा लोकेश मारबते याच्याशी तिची ओळख झाली व प्रेमसंबंध जुळले. दोघेही लग्न करणार होते. दोघांच्याही आईवडिलांची लग्नास सम्मती होती. नंतर काही दिवसांनी लोकेशचे दुस-या मुलीसोबत लग्न जुळले, असे कळल्यावर ती तिवसा (अमरावती) पोलिस स्टेशनला तक्रार देण्यासाठी गेली.

त्याठिकाणी तरुणीच्या आई वडीलांना व लोकेशच्या आई वडिलांना बोलावले होते. परंतु गावात मय्यत झाल्यामुळे तरुणीचे आई- वडिल तिवसा पोलिस ठाण्यात जाऊ शकले नाही. परंतु तरुणी व लोकेश हे लग्न करायला तयार झाले.

काही दिवसांनी आरोपी लोकेश याने लग्नास नकार दिला. तरुणी ३ एप्रिलला सायंकाळी आईच्या घरी रमजान घोटी येथे आली. त्या दिवशी सर्वांनी जेवण करून आराम केला. दुसऱ्या दिवसी दुपारी तरुणीची प्रकृती बिघडली. तिने ओकारी सुद्धा केली.

लगेच तिला हिवराबाजार येथील सरकारी दवाखान्यात नेले. तेथील डॉक्टरांनी रामटेक येथे नेण्यास सांगितले. तेव्हा आई-वडिल सोबत होते. शासकीय रुग्णालय रामटेक येथील डॉक्टरांनी तपासणी करून तिला मृत घोषित केले. मृत तरूणीला पोटाचा विकार असल्याने ती मरण पावली असावी, असे भाऊ आणि आई-वडिलांना वाटले. तिच्या मृतदेहावर अंतिम संस्कार करण्यात आला.

चिठ्ठीने घटनाक्रम उघडकीस

दुसऱ्या दिवशी सर्व घरी असताना मृत तरुणीची लहान बहिण शुभांगी हिने तरुणीची बॅग तपासली असता बॅगमध्ये मृत तरुणीच्या हाताने लिहीलेली चिट्ठी सापडली. चिट्ठी पाहिल्यावर मृत तरुणीच्या भावाचा लक्षात आले की लोकेश मारबते हा मागील एक वर्षापासून तिच्याशी संबंध ठेवून तिच्यासारखा पत्नीसारखा व्यवहार केला.

नंतर लोकेशने लग्नास नकार दिला व त्याचे दुसऱ्या मुलीसोबत लग्न जुळले. त्यामुळे मृत तरुणी दुखावली व तिने कोणालाही काही न सांगता तिने कुठलेतरी विष औषध घेवून आत्महत्या केलेली आहे. तिच्या आत्महत्येस लोकेश मारबते हाच कारणीभूत असल्याचा आरोप तरुणीच्या नातेवाईकांनी केला.

मृत तरुणीच्या भावाला मृत तरुणीने लिहीलेली एक चिट्ठी आढळली व घरी एक चिट्ठी आढळल्याने दोन्ही चिठ्ठ्या देवलापार पोलिसांत देण्यात आल्या. लोकेश मारबते याच्या विरोधात तक्रार केली असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक राजेश पाटील करीत आहे. आरोपीस अद्याप अटक केलेली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com