esakal | सुसाईड नोटमधील शब्द... ‘मरायला कुणाला आवडते होऽऽ, मला पण जगायचं होत’ पण...
sakal

बोलून बातमी शोधा

Young man commits suicide due to loneliness

धर्मेंद्रने आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईड नोट लिहिली. त्यात त्याने ‘मरायला कुणाला आवडते. मला पण जगायच होत. पण, आता मी जीवनाला कंटाळलो आहे. मला जीवन नकोसे झाले आहे. त्यामुळे मी आत्महत्या करीत आहे’ असे लिहिले होते.

सुसाईड नोटमधील शब्द... ‘मरायला कुणाला आवडते होऽऽ, मला पण जगायचं होत’ पण...

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : धर्मेंद्र गेल्या दोन दिवसांपासून कामावर न आल्याने त्याच्या सहकारी ड्रायव्हर मित्राने कॉल केला. मात्र, धर्मेंद्र फोन उचलत नसल्यामुळे त्याने त्याच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला. तो घरी जाऊन आवाज देत होता. मात्र, दार आतून लावलेले होते. अनेक आवाज दिल्यानंतरही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्याने खिडकीतून डोकावून बघितले असता धर्मेंद्र गळफासत लावलेल्या अवस्थेत आढळून आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धर्मेंद्र पालसिंग धनजल (३७, रा. भोसलेवाडी, लष्करीबाग) याच्या आई-वडिलांचा मृत्यू झाला आहे. तो आपल्या बहिणीसोबत राहत होता. तो बहिणीसाठी एकमेव आधार होता. परंतु, कोणत्यातरी कारणावरून बहिणीनेही इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे धर्मेंद्र एकटा पडला होता.

सविस्तर वाचा - सासऱ्याने जावयाची केली दहा लाखांची मदत; मात्र, सासरच्या त्रासाला कंटाळून मुलीने घेतला कठोर निर्णय

धर्मेंद्र हा अविवाहित असल्यामुळे एकटा जीवन व्यतित करीत होता. तसेच खासगी वाहनावर चालक म्हणून काम करीत होता. दोन वर्षांपूर्वी त्याच्या आई आणि वडिलांचे निधन झाले होते.

त्यानंतर काहीच दिवसांत त्याच्या तरुण बहिणीनेही इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या केली होती. तेव्हापासून तो एकटाच राहत होता. एकाकी जीवनाला तो कंटाळला होता. त्यामुळे तो नेहमी नैराश्‍यात राहत होता. त्याने सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

मला जीवन नकोसे झाले आहे

धर्मेंद्रने आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईड नोट लिहिली. त्यात त्याने ‘मरायला कुणाला आवडते. मला पण जगायच होत. पण, आता मी जीवनाला कंटाळलो आहे. मला जीवन नकोसे झाले आहे. त्यामुळे मी आत्महत्या करीत आहे’ असे लिहिले होते. यानंतर त्याने गळफास लावू आत्महत्या केली. याप्रकरणी पाचपावली पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

जाणून घ्या - प्रसूती शस्त्रक्रियेनंतरही मातेला होत होत्या असह्य वेदना; रुग्णालयात भरती करताच पोटात आढळले..

एकटेपणा खूप वाईट असतो

एकटेपणा खूप वाईट असतो. आपल्या आप्तांचे एकाएकी निघून जाणे अनेकांना जगणे असह्य करते. त्यातल्या त्यात ते जर जन्मदाते असतील तर माणूस निराशेच्या खाईत लोटला जातो. मनाला चटका लावणारी अशी ही घटना असते. पिहिले आई-वडील नंतर बहिणीच्या मृत्यूने एकाकी पडलेल्या धर्मेंद्रने गळफास लावून आत्महत्या केली. यामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

loading image
go to top