esakal | विजेच्या तारांना स्पर्श झाल्याने तरुणाचा मृत्यू; महावितरण म्हणे, वीज प्रवाहच नाही
sakal

बोलून बातमी शोधा

तारांना स्पर्श झाल्याने मृत्यू; महावितरण म्हणे, वीज प्रवाहच नाही

तारांना स्पर्श झाल्याने मृत्यू; महावितरण म्हणे, वीज प्रवाहच नाही

sakal_logo
By
सतीष घारड

टेकाडी (जि. नागपूर) : शेतात लोंबकळत असलेल्या विजेच्या जिवंत तारांना स्पर्श झाल्याने ३० वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू (30 year young boy die) झाला. ही घटना पारशिवनी तालुक्यातील माहुली शिवारात आज (ता. १८) दुपारी घडली. स्थानिकांनी या घटनेस महावितरणला जबाबदार ठरविले. संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे तरुणाचा जीव गेल्याचा आरोप नागरिकांनी केला. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली. (Young-man-dies-after-touching-electric-wires-in-Nagpur-rural)

पंकज शंकर भुरे (वय ३०, रा. उमरी, लोहारा, रिठी) असे मृत मजुराचे नाव आहे. राहुल भागवत ढोरे यांच्या शेतात कामाला होता. खरीप हंगाम सुरू होताच शेतीच्या कामाची लगबग सुरू होते. अशावेळी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी शेतातील वीजतारांची पाहणी करणे गरजेचे आहे. शेतात काम करीत असताना पंकज याचा लोंबकळत असलेल्या जिवंत तारेला स्पर्श झाला. ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती पाराशिवनी पोलिसांना देण्यात आली. ठाणेदार संतोष वैरागडे यांनी घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविले. मृताच्या कुटुंबीयांना मदतीची मागणी स्थानिकांनी केली.

हेही वाचा: वाढदिवसापूर्वीच 'ती' निघून गेली, आईने फोडला टाहो

सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

विजेचा तार लोंबकळत असल्याची माहिती महावितरण विभागाला देण्यात आलेली होती. मात्र, या तारेत वीज प्रवाह नसल्याची माहिती महावितरणच्या कर्मजाऱ्यांनी दिली होती, अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली. त्याच ताराला स्पर्श झाल्याने निष्पाप जिवाचा बळी गेल्याने तारेत विजेचा प्रवाह आलाच कसा, असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला. तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यबळाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणीही केली.

(Young-man-dies-after-touching-electric-wires-in-Nagpur-rural)

loading image
go to top