

Nagpur News
sakal
नागपूर : मध्यवर्ती रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक ७ वर थांबलेल्या रेल्वेच्या छतावर अचानक युवक चढला. उच्चदाब वीज वाहिनीच्या (ओएचई) संपर्कात आल्याने विजेचा जबर धक्का लागून तो खाली पडून गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी मेयो रुग्णालयात भरती करण्यात आले. त्याची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास घडली.