शंभर वर्षांच्या दर्ग्यावर बुलडोझर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 ऑक्टोबर 2018

नागपूर : रस्त्यांवरील अकरा अनधिकृत धार्मिक स्थळांवर महापालिकेने आज कारवाई केली. या कारवाईदरम्यान गांधीबाग, लाल इमली चौकातील अरबशाह वली दर्ग्यावर कारवाईदरम्यान गांधीबाग परिसराला पोलिस ताफ्यामुळे छावणीचे स्वरूप आले होते. मात्र, मुस्लिम बांधवांनीही स्वतःहून दर्ग्यातील साहित्यांची उचल केली. या कारवाईदरम्यान काही वेळ अग्रसेन चौक ते गोळीबार चौकादरम्यानची वाहतूकही प्रभावित झाली.

महापालिकेच्या गांधीबाग व सतरंजीपुरा झोनमध्ये आज अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई करण्यात आली. गांधीबाग झोनअंतर्गत गांधीबाग उद्यानाजवळील जागृत नागोबा मंदिर, देवडिया शाळेजवळील हजरत सय्यद रज्जब अली शाह बाबांची मजार, लाल इमली चौकातील शिव मंदिर, नंगा पुतळ्याजवळील म्हसोबा मंदिर तोडण्यात आले. मात्र, याच झोनमधील गांधीबाग मार्केटजवळील अरबशाह अली बाबांचा दर्गा पाडताना पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. अग्रसेन चौक ते गोळीबार चौक या वर्दळीच्या रस्त्यावर हा दर्गा असून कारवाईदरम्यान शेकडो पोलिस उपस्थित होते. या रस्त्यावरून वाहनधारकांचे लक्ष थेट कारवाईकडे जात असल्याने वाहतुकीची कोंडी झाली. ही कोंडी सोडविताना पोलिसांनाही चांगलाच घाम गाळावा लागला.
दरम्यान, या दर्ग्यातील कार्यकर्त्यांनी काही साहित्य बाहेर काढले. त्यानंतर या दर्ग्याला बुलडोझरच्या साहाय्याने पाडण्याचे काम सुरू झाले. त्यामुळे परिसरातील नागरिकांनीही गर्दी केली. पोलिसांना गर्दीतील नागरिकांना हटवावे लागले. सतरंजीपुरा झोनमध्ये इतवारी रेल्वे स्टेशन रोडवरील शीतला माता मंदिर, प्रेमनगर रोड बस्तरवारीतील काली माता मंदिर, हनुमान मंदिर, लालगंजमधील हनुमान मंदिर, मंगळवारी तलावाच्या बाजूचे हनुमान मंदिर, पंचवटीनगरातील मजार, धम्मदीपनगरातील नागोबा मंदिरावर महापालिकेचे अतिक्रमण विभागप्रमुख सहायक आयुक्त अशोक पाटील यांच्या नेतृत्वात कारवाई करण्यात आले.
नोटीस न देता कारवाई
गांधीबाग येथील अरबशाह वली दर्गा हा शंभर वर्षांपेक्षाही जुना असल्याचे 80 वर्षीय मोहम्मद इसराईल रिजवी यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. मनपाने कारवाईसंबंधात कुठलीही नोटीस दिली नसल्याचे साहील खान या तरुणाने नमूद केले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagur nmc news