मतदारयादीत नाव नोंदवले आहे का? 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 मार्च 2017

नागपूर - मतदानाचा टक्का वाढावा आणि अधिकाधिक युवकांनी मतदान करावे, यासाठी उच्च व तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे सर्व विद्यापीठांना दिलेल्या सूचनेनुसार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे महाविद्यालयांच्या प्रवेश अर्जात आपण मतदारयादीत आपले नाव नोंदविले आहे काय? अशा आशयाचा अतिरिक्त तपशील नमूद केला जाणार आहे. 

नागपूर - मतदानाचा टक्का वाढावा आणि अधिकाधिक युवकांनी मतदान करावे, यासाठी उच्च व तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे सर्व विद्यापीठांना दिलेल्या सूचनेनुसार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे महाविद्यालयांच्या प्रवेश अर्जात आपण मतदारयादीत आपले नाव नोंदविले आहे काय? अशा आशयाचा अतिरिक्त तपशील नमूद केला जाणार आहे. 

भारत सर्वांत मोठा लोकशाही देश आहे. स्वातंत्र्याला साठ वर्षांचा काळ लोटला. तरी निवडणुकांमध्ये सरासरी पन्नास टक्केच मतदान होते. याचाच अर्थ निम्मी जनता मतदानच करीत नाही. मतदानाची टक्केवारी वाढावी, यात युवकांचा मोठा सहभाग असावा, अशी यामागे शासनाची भूमिका आहे. त्यानुसार मतदारयादीत तरुणाईचा समावेश होण्यासाठी काही ठोस पावले उचलण्यात आली आहेत. राज्यातील सर्व विद्यापीठे व सर्व महाविद्यालयांमध्ये लाखो विद्यार्थी शिक्षण घेतात. उच्च शिक्षणाच्या एका टप्प्यावर सर्व विद्यार्थी हे त्यांच्या वयाची 18 वर्षे पूर्ण करतात. सदर तरुण मतदारांची अधिकाधिक नाव नोंदणी व्हावी यासाठी राज्य निवडणूक आयोग व राज्य शासनामार्फत नवनवीन उपक्रम हाती घेतले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये व सर्व महाविद्यालयांमध्ये उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्या प्रवेश अर्जात तुम्ही मतदारयादीमध्ये आपले नाव नोंदविले आहे काय?, या प्रकारचा एक अतिरिक्त तपशील विचारणा करण्याचे निर्देश विद्यापीठाने सर्व महाविद्यालयांना दिले आहेत. 

याअनुषंगाने विद्यापीठाच्या प्रवेश अर्जात अशा प्रकारच्या अतिरिक्त तपशील मागणीचा समावेश करून आठ दिवसांच्या आत शासनास अर्जाचे सुधारित नमुने सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच परदेशी विद्यार्थी अथवा परराज्यातील विद्यार्थ्यांबाबत निर्माण होणारी अडचणदेखील तपासण्यात यावी. प्रत्येक विद्यार्थ्याला ज्या वेळी मतदानाचे वय पूर्ण होईल तेव्हा मतदार नोंदणी अनिवार्य करण्याबाबत आपले अभिप्राय तपशीलासह शासनास तत्काळ सादर करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. 

Web Title: The name list of voters is reported