नागपुरच्या महापौरपदी भाजपच्या नंदा जिचकार

वृत्तसंस्था
रविवार, 5 मार्च 2017

महापालिकेच्या निकालानंतर शहराच्या नव्या महापौर कोण? याविषयी सुरू असलेल्या तर्क-वितर्कांना भाजपने बुधवारी पूर्णविराम देत भाजपने महापौर म्हणून नंदा जिचकार तर उपमहापौरपदासाठी दीपराज पार्डीकर यांची नावे निश्‍चित केली होती.

नागपूर - नागपूर महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपच्या नंदा जिचकार यांनी 82 मतांनी आणि दीपराज पार्डिकर यांनी उपमहापौरपदाच्या निवडणुकीत विजय मिळविला. 

महापालिकेच्या निकालानंतर शहराच्या नव्या महापौर कोण? याविषयी सुरू असलेल्या तर्क-वितर्कांना भाजपने बुधवारी पूर्णविराम देत भाजपने महापौर म्हणून नंदा जिचकार तर उपमहापौरपदासाठी दीपराज पार्डीकर यांची नावे निश्‍चित केली होती. आज झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत नंदा जिचकार यांनी 82 मतांनी विजय मिळविला. त्यांना एकूण 108 मते मिळाली. तर, काँग्रेसच्या स्नेहा नीकोसे यांना 26 मते आणि बसपाच्या वंदना चांदेकर यांना 10 मते मिळाली. उपमहापौरपदाच्या निवडणुकीत दीपराज पार्डिकर यांनी 80 मतांनी विजय मिळविला.

भाजपचे 108 नगरसेवक निवडून आले आहेत. महापालिकेच्या आजवरच्या इतिहासात प्रथमच बहुमताचे सरकार आले आहे. जिचकार या दहा वर्षांनंतर महापालिकेत परतल्या आहेत. त्या भाजपच्या महिला आघाडीच्या शहर अध्यक्षा आहेत. प्रभाग क्रमांक 37 मधून त्या विजयी झाल्या आहेत. काँग्रेस शहराध्यक्ष विकास ठाकरे लढत असलेल्या या प्रभागातून चारही भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत. ठाकरे यांच्यासारख्या दिग्गज उमेदवाराला पराभूत केल्याचे बक्षीस म्हणून त्यांना महापौरपद देण्यात आल्याची चर्चा आहे. 

Web Title: Nanda Jichkar new Mayor of Nagpur