नांदेड-निझामुद्दीन विशेष गाडी गुरुवारपासून

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 मे 2018

उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे प्रवाशांची हाेणारी लक्षणीय वाढ बघता, दक्षिण-मध्य रेल्वेने २४ विशेष रेल्वे गाड्या सुरू करण्याच निर्णय घेतला आहे. दिल्ली, आग्रा, भोपाळ, मथुरा, झांशी आदी ठिकाणी जाण्याकरिता विशेष गाडी चालविण्याची मागणी सर्व स्तरातून होत असताना, खासदार संजय धोत्रे यांचा दक्षिण मध्य रेल्वेकडे पाठपुरावा सुरू हाेता.

अकाेला : उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे वाढलेली प्रवाशी संख्या लक्षात घेता दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने नांदेड-दिल्ली या मार्गावर विशेष गाडीच्या २४ फेऱ्यांचे नियोजन केले आहे. अकाेलामार्गे धावणारी नांदेड- निझामुद्दीन विशेष रेल्वे गाडी गुरुवारपासून (ता.१०) सुरू हाेणार आहे.

उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे प्रवाशांची हाेणारी लक्षणीय वाढ बघता, दक्षिण-मध्य रेल्वेने २४ विशेष रेल्वे गाड्या सुरू करण्याच निर्णय घेतला आहे. दिल्ली, आग्रा, भोपाळ, मथुरा, झांशी आदी ठिकाणी जाण्याकरिता विशेष गाडी चालविण्याची मागणी सर्व स्तरातून होत असताना, खासदार संजय धोत्रे यांचा दक्षिण मध्य रेल्वेकडे पाठपुरावा सुरू हाेता. प्रवाश्यांच्या मागणीला लक्षात घेवून नांदेड विभागाने नांदेड-दिल्ली या मार्गावर मे, जून आणि जुलै या तीन महिन्यात २४ विशेष गाड्या चालविण्याचे दक्षिण मध्य रेल्वेतर्फे ठरविण्यात आले आहे. यामध्ये गाडी क्रमांक ०२४८५ नांदेड-हजरत निझामुद्दीन आणि गाडी क्रमांक ०२४८६ निझामुद्दीन- नांदेड ही विशेष रेल्वे अकाेलामार्गे धावणार आहे. दाेन्ही गाड्यांचा लाभ अकाेल्यातील प्रवाशांना मिळणार आहे. गाडीमध्ये एक द्वितीय वातानुकुलीत, एक तृतीय श्रेणी वातानुकुलीत, सात द्वितीय श्रेणी शय्या, सहा जनरल आणि दाेन एस.एल.आर. असे एकूण १७ बाेगी राहतील.

विशेष गाडी
१) ०२४८५ नांदेड ते हजरत निझामुद्दीन (दर गुरुवारी)
नांदेड रेल्वे स्थानकातून दर गुरुवारी रात्री २३.०० वाजता सुटेल. पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशीममार्गे शुक्रवारी पहाटे ५.५४ वाजता अकाेल्यात पाेहाेचणार आहे. येथून खांडवा, इटारसी, भोपाल, झांसी, आग्रा मार्गे निझामुद्दीन येथे शनिवारी रात्री ०२.०० वाजता पोहोचेल. ही गाडी नांदेड येथून १०, १७, २४, ३१ मे, ७, १४, २१, २८ जून आणि ५, १२, १९, २६ जुलै या तारखांना सुटणार आहे.

२) ०२४८६ निझामुद्दीन ते नांदेड (दर शनिवारी)
निझामुद्दीन रेल्वे स्थानकावरून दर शनिवारी सकाळी ०५.५० वाजता सुटेल. येथून आग्रा, झांशी, भोपाल, इटारसी, खांडवामार्गे रविवारी रात्री १.२० वाजता अकाेल्यात पाेहाेचणार आहे. येथून पुढे वाशीम, हिंगोली, बसमत मार्गे नांदेड येथे रविवारी सकाळी ०७.०० वाजता पोहोचेल. ही गाडी निझामुद्दीन येथून दर शनिवारी १२, १९ , २६ मे, २,९,१६, २३, ३० जून आणि ७, १४, २१, २८ जुलै या तारखांना सुटणार आहे.

Web Title: Nanded Nijamuddin railway starts