मुख्याधिकाऱ्याच्या बदली विरोधात नरखेड बंद

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 जुलै 2019

नरखेड (जि. नागपूर) : नरखेड पालिकेच्या मुख्याधिकारी माधुरी मडावी यांच्या बदलीच्या विरोधात स्थानिकांनी शुक्रवारी बंद पुरकारला. नागरिकांनी बंदच्या आवाहनाला प्रतिसाद देत कडकळीत बंद पाळला. पोलिसांचा तगडा बंदोबस्त नरखेड शहरात लावण्यात आला आहे.

बुधवारी जिल्ह्यातील बहुतांश नगर पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. माधुरी मडावी यांचाही त्यात समावेश होता. त्यांच्या बदलीची वार्ता नरखेडमध्ये पोहचताच नागरिकांनी या सरकारच्या या निर्णयाचा विरोध केला. गुरुवारी नगर परिषदेसमोर धरणा देत बदली रद्द करावी अशी मागणी केली. याचवेळी शुक्रवारी नरखेड बंदचे आवाहन केले. शुक्रवारी सकाळपासूनच मुख्य बाजारपेठेतील दुकाने बंद होती. एकही दुकान सुरू नव्हते. नागरिकांनी नरखेड बंद ठेवण्यासाठी पुढकार घेतला. दुपारी नागरिक नगर पालिकेसमोर एकत्र आले. सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करीत मुख्याधिकारी माधुरी मडावी यांच्या बदली रद्द करावी, अशी जोरदार मागणी केली. काटोलचे माजी आमदार डॉ. आशीष देशमुख यांनीही नरखेडला भेट दिली. नरखेडचा विकास करण्यात माधुरी मडावी प्रयत्न करीत असून काही लोकांच्या डोळ्यात ते खुपत असल्याने ते राजकारण करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Narkhed closed against the transfer of Nagar Parishad CO