esakal | नरखेड-काचीगुडा रेल्वे पडली बंद; मोर्शी-परतवाडा रस्त्यावर तीन तास वाहतूक खोळंबली

बोलून बातमी शोधा

{"A?":"B","a":5,"d":"B","h":"www.canva.com","c":"DAERspJsD6g","i":"ZrGdgpLMmQdrSXyw0lSx8Q","b":1614756482034,"A":[{"A?":"I","A":54,"B":784.3604356429303,"D":121.63956435706982,"C":35.712620171798754,"a":{"B":{"A":{"A":"MAEWkbeQURQ","B":1},"B":{"A":-0.8319}

०७६४२ ही गाडी नरखेड येथून पहाटे काचीगुडा येथे जाण्यासाठी दररोज निघते. मोर्शी येथे ही गाडी सकाळी ५.४५ च्या दरम्यान पोहोचते. ती सकाळी अमरावती, अकोला पोहोचत असल्याने व तिकीट कमी असल्याने सामान्य नागरिकांसोबतच चाकरमाने या गाडीला प्राधान्य देतात.

नरखेड-काचीगुडा रेल्वे पडली बंद; मोर्शी-परतवाडा रस्त्यावर तीन तास वाहतूक खोळंबली
sakal_logo
By
टीम ई सकाळ

मोर्शी (जि. अमरावती) : नरखेड येथून पहाटे निघणारी काचीगुडा पॅसेंजर रेल्वे मोर्शी-चांदूरबाजार रस्त्याच्या मध्यात बंद पडल्याने तीन तास परतवाडा रस्ता वाहतुकीसाठी बंद होता. त्यामुळे वाहतूकदारांना मोठा त्रास सहन करावा लागला.

०७६४२ ही गाडी नरखेड येथून पहाटे काचीगुडा येथे जाण्यासाठी दररोज निघते. मोर्शी येथे ही गाडी सकाळी ५.४५ च्या दरम्यान पोहोचते. ती सकाळी अमरावती, अकोला पोहोचत असल्याने व तिकीट कमी असल्याने सामान्य नागरिकांसोबतच चाकरमाने या गाडीला प्राधान्य देतात. परंतु आज सकाळी सहाच्या दरम्यान ही गाडी मोर्शी रेल्वेस्थानकाच्या हाकेच्या अंतरपासून असलेल्या मोर्शी ते चांदूरबाजार- परतवाडा या क्रॉसिंगवर बंद पडली.

 हेही वाचा - धक्कादायक! अमरावती जिल्हापरिषदेत कोरोना ब्लास्ट; एकाच दिवशी 13 कर्मचारी पॉझिटिव्ह

ही गाडी नऊ ते साडेनऊ वाजेपर्यंत रस्त्यात असल्याने मोर्शी-चांदूरबाजार हा मार्ग पूर्णपणे बंद होता. त्यामुळे दुतङ्र्का गाड्या उभ्या होत्या. नरखेड येथून सकाळी निघालेली ही गाडी वरुड येथेच बंद पडलेली होती, परंतु ती गाडी सुरू करून पुढे आणण्याचा प्रयत्न केला असता ती मधातच बंद पडली.

त्यामुळे विनाकारणचा त्रास झालेला असल्याचे एका प्रवाशाने सांगितले. रस्त्याच्या मध्ये बंद पडलेली गाडी सुरू होत नसल्याचे पाहून नरखेड येथून दुसरे इंजिन बोलवावे लागले. या कामाकरिता तीन ते साडेतीन तास लागले. 

हेही वाचा - यवतमाळच्या पालकमंत्रीपदासाठी राष्ट्रवादीकडून लॉबिंग सुरू? पुसदचा बंगला केंद्रस्थानी;...

या गाडीत अनेक प्रवाशांनी दुस-या ठिकाणाहून रिझव्र्हेशन केले असल्याने व गाडी तीन ते साडेतीन तास उशिरा निघाल्याने त्यांचे रिझर्वेशन वाया गेले असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर काही विद्याथ्र्यांच्या मुलाखतीसुद्धा असल्याने त्यांना मोठा त्रास सहन करावा लागला.