यवतमाळच्या मैदानावर राष्ट्रीय खेळाडूचा सराव

प्रशिक्षक स्वर्ण सिंग यांच्याकडून धावपटू निहारिका वशिष्टला प्रशिक्षण
यवतमाळच्या मैदानावर राष्ट्रीय खेळाडूचा सराव

यवतमाळ : थंडीचे दिवस असले तरी यवतमाळात थंडी कधी शून्य अंश सेल्सिअसच्या(Zero degrees Celsius) खाली जात नाही. त्यामुळे येथे हिवाळ्यात खेळाडू चांगला सराव करू शकतात. हीच गोष्ट हेरून आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेची तयारी करीत असलेली राष्ट्रीय धावपटू निहारिका रामकुमार वशिष्ट हिने येथील नेहरू क्रीडा मैदानाची निवड केली आहे. आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलिट व क्रीडा प्रशिक्षक सुवर्ण सिंग यांच्या मार्गदर्शनात ती येथे हिवाळ्यात दररोज एक महिना सराव करणार आहे.

येथील जिल्हा क्रीडा संकुलाच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर फुटबॉलचे मैदान झाल्यापासून सराव करणार्‍या खेळाडूंची संख्या वाढली आहे. मॉर्निंग वॉकला येणार्‍या नागरिकांचीही सोय झाली आहे. येथील नैसर्गिक वातावरण खेळासह सरावासाठी पोषक आहे. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक प्रशिक्षक असलेले स्वर्ण सिंग यांनी एशियन, कॉमनवेल्थ आणि ऑलिंपिक स्पर्धेच्या पार्श्‍वभूमिवर राष्ट्रीय धावपटू निहारीका रामकुमार वशिष्ठ हिला प्रशिक्षण देण्यासाठी यवतमाळची निवड केली आहे. ती येथील नेहरू क्रीडांगणावर ऑलिंपिक स्पर्धा जिंकण्याचे स्वप्न उराशी बाळगून सराव करीत आहे.

यवतमाळच्या मैदानावर राष्ट्रीय खेळाडूचा सराव
सत्ता द्या, महिलांना दरमहा हजार रुपये देतो: केजरीवाल

स्वर्ण सिंग हे मूळचे पंजाबचे रहिवासी आहेत. त्यांची यवतमाळशी 1972 पासून नाळ जुळली आहे. नेहरू युवा केंद्र सुरू झाले त्यावेळी पहिली नियुक्ती सिंग यांना यवतमाळातच देण्यात आली होती. त्यावेळी खेळाडूंना मैदान तर सोडा साधा बूटही मिळत नसे. खेळासंदर्भात प्रचंड उदासीनता होती. याच काळात स्वर्ण सिंग यांनी बापू सहस्रबुद्धे यांच्यासारख्या खेळाडूंना घडविले. सिंग यांच्या संस्कामुळेच आम्ही घडलो, जीवन जगण्याची कला अवगत झाली, असे सहस्रबुद्धे सांगतात. आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक सिंग हे भारतीय खेळ प्राधिकरणातून 2002 मध्येच सेवानिवृत्त झाले. मात्र, त्यांनी निवृत्तीनंतर मैदान सोडले नाही. उलट ग्रामीण व उपेक्षित भागातील खेळाडू पुढे आले पाहिजेत, याचा शोध चालविला. त्यांनी मोहाली येथे स्पोर्ट अ‍ॅकेडमी सुरू करून मोफत क्रीडा प्रशिक्षण सुरू केले. अशातच त्यांची नजर मोहाली येथील निहारीका वशिष्ठ हिच्या खेळावर गेली. तिने शालेय, महाविद्यालय, स्टेट स्पर्धेत ट्रिपल, लाँग जंप स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले आहे. तर, खुल्या नॅशनल स्पर्धेत सिल्वर पदक मिळविले आहे. तिच्या याच यशामुळे आगामी काळात होणार्‍या अ‍ॅथलेटिक, कॉमनवेल्थ, एशियन गेम्स आणि जागतिक पातळीवर होणार्‍या क्रीडा स्पर्धेसाठी अपेक्षा उंचावली आहे. एक एक टप्पा पार करत ती ऑलिंपिक स्पर्धेकडे वाटचाल करीत आहे.

यवतमाळच्या मैदानावर राष्ट्रीय खेळाडूचा सराव
कोर्टाच्या आदेशाचं पालन केलं असतं तर ओबीसी आरक्षण गेलं नसतं; पाहा व्हिडिओ

मुलीच्या करिअरसाठी वडिलांनी सोडली नोकरी

निहारीका वशिष्ठ हिचे वडील रामकुमार वशिष्ठ हे एका इन्शुरन्स कंपनीत शाखा व्यवस्थापक म्हणून नोकरीला होते. ते कोणतीही क्रीडा स्पर्धा खेळले नाहीत. मात्र, मुलीत असलेल्या सुप्तगुणाला ओळखून त्यांनी मुलीच्या क्रीडा करिअरसाठी चक्क आपल्या नोकरीचा राजीनामा दिला. निहारीका हिचे शिक्षण एम.ए. इंग्रजी वांडमयात झाले आहे. तिने पंजाब विद्यापीठातील डीएव्ही महाविद्यालयातून पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे. तर, वयाच्या 80 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक स्वर्ण सिंग निहारिकाच्या यशासाठी अथक प्रयत्न करीत आहेत. यालाच खेळाप्रति जिज्ञासा असे म्हणतात.

1972 मध्ये यवतमाळला पहिली नियुक्ती मिळाली. त्यावेळी येथे कोणत्याही प्रकारच्या क्रीडा सुविधा उपलब्ध नव्हत्या. आताच्या नेहरू क्रीडांगणाच्या मार्किंगचे काम माझ्याच उपस्थितीत झाले होते. येथे चांगले खेळाडू आहेत. त्यांना योग्य संधीची प्रतीक्षा आहे. लोकांनी खेळाकडे वळले पाहिजे. त्यामुळे देश, राज्य व जिल्ह्याला नावलौकिक मिळतो. आपल्यातील कलागुण दाखविण्याला वाव मिळतो. हेल्थ, वेल्थ आणि फेम या गोष्टी खेडाळूंना मिळतात.

- स्वर्ण सिंग अ‍ॅथलेटिक प्रशिक्षक, पंजाब

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com