नागपूरात राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीचे 'संविधान वचाव, देश बचाव' आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 जुलै 2018

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला दुसऱ्या स्वातंत्र्य लढ्यासाठी रस्त्यावर उतरल्या असल्याचे राष्ट्रवादी महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा फाैजीया खान यांनी शुक्रवारी (ता.६) अकोला येथे पत्रकार परिषदेत सांगितले. 

अकोला - या देशातील महिला व मुली असुरक्षित आहेत. मनुस्मृतीचे राज्य पुन्हा या देशात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. महिलांचे स्वातंत्र्य हिरवले जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला दुसऱ्या स्वातंत्र्य लढ्यासाठी रस्त्यावर उतरल्या असल्याचे राष्ट्रवादी महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा फाैजीया खान यांनी शुक्रवारी (ता. ६) अकोला येथे पत्रकार परिषदेत सांगितले. 

नागपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे १७ जुलै ला संविधान वचाव, देश बचाव रॅलीचे आयोजन राष्ट्रवादी महिला आघाडीतर्फे करण्यात आले आहे. या रॅलीच्या नियोजनासाठी अकोला येथे आल्या असता त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या. महिलांसाठी या देशात सुरक्षित वातावरण नाही. त्यांच्या अधिकारावरच गदा येत आहे. लोकशाही धोक्यात आहे. काय खायचे, कसे राहयचे, काय बोलायचे याचे अधिकारही काढून घेतले जात आहे. विरोध केला तर धमक्या व हत्या करण्याचे प्रकार या देशात सुरू आहे. ही एक प्रकारे अघोषित आणिबाणीच आहे. महिलांना त्यांच्या अधिकारासाठी आता दुसरा स्वातंत्र लढा लढावा लागणार आहे. त्याकरिता राष्ट्रवादीच्या महिला रस्त्यावर उतरून आंदोलन करीत असल्याचे फाैजीया खाना यांनी सांगितले. आंदोलनात नागपूर येथे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह सर्वच नेते सहभागी होत असल्याची माहिती त्यांनी दिली. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादीचे प्रदेश महासचिव श्रीकांत पिसे पाटील,जिल्हाध्यक्ष विजय देशमुख, महानगराध्यक्ष राजकुमार मुलचंदाणी, महिला आघाडी प्रदेश महासचिव मंदाताई देशमुख आदींसह स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. 

जिल्ह्यातून ३०० वर महिलांचा सहभाग -
नागपूर येथे होत असलेल्या आंदोलनात अकोला जिल्ह्यातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या ३०० च्यावर महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या सहभागी होणार आहे. याशिवाय बुलडाणा आणि वाशीम येथूनही महिलांचा या आंदोलनात सहभाग असल्याची माहिती फाैजीया खान यांनी दिली.      
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Nationalist Congress Womens Alliances agitation in Nagpur