हिंगणा विधानसभेसाठी राष्ट्रवादीकडून चाचपणी

हिंगणा विधानसभेसाठी राष्ट्रवादीकडून चाचपणी

हिंगणा (जि. नागपूर) :  विधानसभेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष उमेदवारांची चाचपणी सुरू झाली आहे. याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांनी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेऊन संवाद साधला. यावेळी शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
22 ऑगस्ट रोजी माजी मंत्री रमेशचंद्र बोस यांच्या निवासस्थानी विधानसभा क्षेत्रप्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांनी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आपली मते मांडण्यास सांगितले. विधानसभा निवडणुकीत उमेदवार कोण असावा, यावर विचारमंथन करण्यात आले. उपस्थित काही कार्यकर्त्यांनी माजी मंत्री बंग यांनी उभे राहावे, अशी मागणी रेटून धरली. तर काही कार्यकर्त्यांनी वेगळी भूमिका मांडली. सर्व कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यात आली. सर्वाधिक कार्यकर्त्यांची मते माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांच्या बाजूने दिसली. विधानसभेच्या तयारीच्या दृष्टीने सर्वाधिक मोठी बैठक ठरली. विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गावातील प्रमुख पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com