esakal | Video : राणा दाम्पत्यानी विना मास्क खेळला ‘मॅच’; कोरोनाचा नायनाट करायचा? अगोदर स्वतः मास्क घाला
sakal

बोलून बातमी शोधा

Navneet Rana and Ravi Rana played a cricket match at Melghat

कोरोनाच्या या काळात होळी सुरक्षितपणे घरात, परिवारासोबत होळी साजरी करा. कोरोनाचा आपल्याला नायनाट करायचा आहे, त्यामुळे प्रत्येकाने खबरदारी घ्यावी, असे आवाहन खासदार नवनीत राणा तसेच आमदार रवी राणा यांनी केले.

Video : राणा दाम्पत्यानी विना मास्क खेळला ‘मॅच’; कोरोनाचा नायनाट करायचा? अगोदर स्वतः मास्क घाला

sakal_logo
By
सुरेंद्र चापोरकर

अमरावती : होळी हा मेळघाटच्या आदावासी बांधवांचा सर्वांत मोठा सण असल्याने खासदार नवनीत राणा तसेच आमदार रवी राणा सध्या मेळघाटात दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे अकरा वर्षांपासून होळीचा सण मेळघाटातच साजरा करण्याचा त्यांची परंपरा आहे. आज मेळघाटातील गावात आदिवासी बालकांसोबत क्रिकेट खेळून खासदार नवनीत राणा यांनी मनसोक्त आनंद लुटला व बालकांचे मनोबल वाढविले.

गावागावात युवकांना सक्षम, सुदृढ बनविण्यासाठी त्यांची खेळाची आवड जोपसण्यासाठी क्रिकेट व व्हॉलीबॉल किटचे वाटप आमदार रवी राणा व खासदार नवनीत रवी राणा यांच्या हस्ते करण्यात येत आहे. होळीच्या निमित्ताने खासदार नवनीत राणा तसेच आमदार रवी राणा मेळघाटच्या विविध गावांना भेटी देणार असून आदिवासी बांधवांसोबत ते होळी साजरी करीत आहेत.

जाणून घ्या - महत्त्वाची बातमी! दोन लसीकरणानंतरही शरीरात तयार होत नाहीये अँटीबॉडीजची निर्मिती; तपासातून पुढे आली महिती

कोरोनाच्या या काळात होळी सुरक्षितपणे घरात, परिवारासोबत होळी साजरी करा. कोरोनाचा आपल्याला नायनाट करायचा आहे, त्यामुळे प्रत्येकाने खबरदारी घ्यावी, असे आवाहन खासदार नवनीत राणा तसेच आमदार रवी राणा यांनी केले. हे सांगताना राणा दाम्पत्यांना कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावा स्पष्टपणे विसर पडल्याचे दिसले. यावेळी दोघांनीही मास्क परिधान केला नव्हता तर सोशल डिस्टन्सिंगचा तर फज्जाच उडवला होता.

नियम धाब्यावर बसवून जल्लोषात होळी

महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरत आहे. देशात सर्वांत जास्त कोरोना विषाणूचे रुग्ण असणाऱ्या पहिल्या दहा शहारांमध्ये महाराष्ट्रातील नऊ शहरांचा समावेश आहे. अशातच अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी कोरोना विषाणू संबंधित नियम धाब्यावर बसवून जल्लोषात होळी साजरी केली आहे. त्यामुळे कोरोनाचे नियम केवळ सामान्यांनाच आहेत का, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

जाणून घ्या - आत्महत्येपूर्वी दीपालीने पतीला लिहिले भावनिक पत्र; ‘तुला लग्नात दिलेली सगळी वचन अर्धवट सोडून मी जातेय’

विनामास्क आदिवासींसोबत बेफाम डान्स

राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अस असताना मास्क न घालताच नवनीत राणा यांनी आदिवासी महिलांसोबत नृत्य केले. नवनीत राणा यांनी आदिवासी महिलांसोबत पारंपारिक नृत्यावर ठेका धरला. कोरोना नियम धाब्यावर बसवून ठेवले होते. दोघांनी तोंडाला मास्क बांधले नव्हते तर सोशल डिस्टसिंगचे तीनतेरा वाजले होते.

loading image