Navneet Rana BJP
esakal
नवनीत राणा यांच्यामुळे अमरावतीत भाजपला नुकसान झालं असून त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी, असं पत्र भाजपच्या पराभूत उमेदवारांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं होतं. या पत्राची आता भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दखल घेतली आहे. यासंदर्भात लवकरच कारवाई सुरु करण्यात येणार असून वरिष्ठ नेत्यांची एक टीम अमरावती दाखल होणार आहे. अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.