नवनीत राणा प्रकरणाची सुनावणी आता २९ सप्टेंबरला

MP Navneet Rana appointed on Women Empowerment Committee of Loksabha
MP Navneet Rana appointed on Women Empowerment Committee of Loksabha

अमरावती : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राच्या मुद्यावर आता २९ सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. आज या प्रकरणातील सुनावणी पुढे ढकलण्यात आली.

२०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांनी अमरावतीतून अनुसूचित जाती विभागातून निवडणूक लढविली होती. ही निवडणूक त्यांनी जिंकली. त्यांचे जात प्रमाणपत्र अवैध असल्याचा आरोप माजी खासदार व शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांनी केला होता. श्री. अडसूळ यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

MP Navneet Rana appointed on Women Empowerment Committee of Loksabha
केंद्रामुळे आरक्षणाचा विषय अवघड झाला : अशोक चव्हाण

त्यावर झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने नवनीत राणा यांचे जातप्रमाणपत्र रद्द करून त्यांना दोन लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. दरम्यान, खासदार नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करीत उच्च न्यायालयाच्या निकालाला आव्हान दिले होते. सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या या प्रकरणात गेल्या काही महिन्यांपासून सुनावणी सुरू आहे, आज त्यात २९ सप्टेंबर ही पुढची तारीख देण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com