

भाजप नेत्या नवनीत राणा यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीय. नवनीत राणा यांना पत्र पाठवून अज्ञातानं धमकी दिलीय. या धमकीमागे हैदराबाद कनेक्शन असल्याची माहिती समोर आलीय. तुमच्या मुलासमोरच तुमच्यावर बलात्कार करू अशी धमकी या पत्रातून दिली आहे. याशिवाय पत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेखही केला आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलीय.