खासदार नवनीत राणा ऑन दि स्पॉट, अधिकाऱ्यांना धरले धारेवर

navneet rana
navneet rana

अमरावती : विदर्भाचे काश्‍मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिखलदरा येथील विविध रस्त्यांचा विकास तसेच परिसरातील विविध पॉंइंटचे सौंदर्यीकरण सुरू आहे. या कामाचा आढावा खासदार नवनीत राणा यांनी चिखलदरा येथे भेट देऊन घेतला.
चिखलदरा येथील पर्यटनस्थळाला गती येण्याकरिता ब्रह्मसती डॅमची निर्मिती, चिखलदरा येथे स्कायवॉकची निर्मिती, केबल कार, विविध रस्त्यांचा विकास तसेच परिसरातील विविध पॉइंटचे सौंदर्यीकरण इत्यादी कामे सुरू आहेत. या
विकासकामांची प्रगती जाणून घेण्यासाठी खासदार नवनीत राणा यांनी विश्रामगृह येथे अधिका-यांची बैठक घेतली.

सविस्तर वाचा - प्रियकराने टाकला दबाव, प्रेयसीला झाले असह्य अन...
यानंतर खासदार नवनीत राणा यांनी गोरेघाट येथील स्कायवॉकची पाहणी, भीमकुंड, गावीलगढ किल्ला, देवी पॉइंट, ब्रह्मसती डॅम, न्यू शिवसागर पॉइंट, पंचबोल पॉइंट, गोलमार्ग मखजी रोड, शिवजी मंदिर, मोझरी पॉइंट, हरिकेन पॉइंट, सनसेट पॉइंट व इतर पर्यटनस्थळांना भेट दिली. या भेटीदरम्यान सिडकोच्या माध्यमातून सुरू असलेल्या रस्त्यांचे काम निकृष्ट असल्याचे खासदार नवनीत राणा यांच्या निदर्शनास आले. खडीकरणाच्या व डांबरीकरणाच्या कामात जास्त तफावत असल्याचे खासदार नवनीत राणा यांच्या निदर्शनास आल्यामुळे उपस्थित अधिका-यांना त्यांनी धारेवर धरले. तसेच सिडकोच्या पैशाचा दुरुपयोग होत असून याची तक्रार आपण मुख्यमंत्री, मुख्य सचिव व सिडकोच्या एमडीकडे करणार असल्याचेही सांगितले.
तसेच चिखलदरा येथील विकास आराखडा हा पर्यटकांच्या सोयीचा आराखडा असावा, अशा सूचना आमदार रवी राणा यांनी उपस्थित अधिका-यांना दिल्या. त्याचप्रमाणे सिडकोच्या विकासकामामध्ये जी तफावत आहे त्या तफावतीचा मुद्दासुद्धा आपण विधानसभेत मांडणार असल्याचे आमदार रवी राणा यांनी स्पष्ट केले.
बैठकीला डीएफओ पीयूषा जगताप, विनोद शिवकुमार, देवेंद्र जामनेकर, संजय हेडा, चंद्रकांत खेरडे, राजेशकुमार मिश्रा, नगरपंचायतच्या अध्यक्ष विजया सोमवंशी, बांधकाम सभापती राजेश मांगलेकर, सुवर्णा चंदामी, अनवर हुसैन, राजेंद्र सोमवंशी, सुषमा मालवीय, श्रीमती बेठे, अरुण तायडे, अजय मोरया, उपेन बछले, राजेश वर्मा, अजय मोरया उपस्थित होते.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com