esakal | 'रोजगार हमीपेक्षा नागरिकांना कोरोनातून वाचविणे महत्वाचे'
sakal

बोलून बातमी शोधा

Nawab Malik

'रोजगार हमीपेक्षा नागरिकांना कोरोनातून वाचविणे महत्वाचे'

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

गोंदिया : कोरोनाने सर्वत्र हाहाकार माजवला आहे. लॉकडाऊनमुळे लोकांच्या, विशेष करून मजुरांच्या हाताला काम उरले नाही. त्यामुळे दोन वेळचे जेवण मिळणेही कठीण होऊन बसले आहे. अशातच 'रोजगार हमीची कामे देण्यापेक्षा कोरोनातून लोकांचा जीव वाचविणे महत्वाचे आहे', असे वक्तव्य गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी केले. त्यामुळे त्यांच्या विरोधात रोष व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा: सावधान! 'या' शहरात फक्त एक नव्हे तर ५ नवीन स्ट्रेन, लक्षणात बदल

कोरोनाने शहरासह ग्रामीण भागात मृत्यूदर वाढलाय. मात्र, इतक्या महामारीच्या काळात कोणाला बाहेर निघण्याची आवड नाही. पण, पोटाची खळगी भरण्यासाठई गरिबांना बाहेर पडावेच लागते. एक दिवस काम केलं नाहीतर खाणार काय? असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकलाय. अशातच रोजगार हमी योजनेची कामे सुरू राहिली तर पोटाचा प्रश्न तरी मिटेल, अशी ग्रामस्थांची आशा आहे. त्यामुळे ते सुरू ठेवावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. मात्र, रोजगार हमी उपलब्ध करून देण्याचं सोडून पालकमंत्री काहीतरी वेगळंच बोलत आहे, अशी टीका मलिकांवर केली जात आहे.

गोंदिया जिल्ह्यात अद्यापही रोजगार हमी योजनेची कामे सुरू झालीच नाहीत. त्यामुळे मजूरवर्ग हवालदिल झाला आहे. हाताला काम नसल्याने मजुरवर्गावर उपासमारीची वेळ आली आहे. लॉकडाऊनमुळे बाजार बंद आहेत. त्यामुळे हाताला इतर कामही मिळणे दुरापास्त झाले आहे. अशा परिस्थितीत कोरोनाने जीव जाईल तेव्हा जाईल, पण उपासमारीने लोक मरू नये, रोजगार हमीची व्यवस्था तरी प्रशासनाने करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.

loading image